adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला, पोलीस ठाण्याला प्रथमच महिला अधिकारी!

 वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला, पोलीस ठाण्याला प्रथमच महिला अधिकारी!  संभाजी पुरीगोसावी (प...

 वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला, पोलीस ठाण्याला प्रथमच महिला अधिकारी!


 संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 पुणे शहर पोलीस दलात पुन्हा दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या आदेशावरून बदल्या करण्यात आल्या. यामध्ये सिंहगड पोलीस ठाणेतील गुन्हे पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांची अलंकार पोलीस ठाण्यात तर अलंकार पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे यांची लोणीकंद पोलीस ठाण्यात बदली करण्यात आल्या असून या दोन्ही अधिकाऱ्यांनी आपला पदभार स्वीकारला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे या पुणे शहर पोलीस दलातील एक अनुभवी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी यापूर्वी अलंकार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून यशस्वी जबाबदारी सांभाळली होती. कोथरूड/कर्वेनगर परिसरांत सोनसाखळी,चोरटे आणि गुन्हेगारींवर अंकुश मिळवण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. महिलांच्या सुरक्षेशी संबंधित खंडणी गुन्हेगारी प्रकरणांत (उदा.) खाजगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणे) त्यांनी यशस्वी तपास केला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकांने अवैध शस्त्र (पिस्तूल जिवंत काडतुसे) जप्त करण्यात कारवाई केली आहे. त्यांनी पुणे पोलीस दलात खंडणी विरोधीं पथक किंवा गुन्हे शाखेतही सेवा बजावली आहे. लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेंराव कुंभार यांच्या अचानक दुर्दैवी निधनामुळे संपूर्ण पुणे शहर पोलीस दल शोक सागरात बुडाले होते. सर्जेराव कुंभार यांनी लोणीकंद आणि अतिरिक्त चार्ज म्हणून त्यांच्याकडे वाघोली या पोलीस ठाण्याचाही पदभार होता. लोणीकंद पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनीही पुणे शहर पोलीस दलात विविध पोलीस ठाण्यात आणि विविध पदावर पोलीस खात्यात उत्कृंष्ट सेवा बजावली होती. कुंभार यांच्या निधनामुळे अजूनही पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. आज लोणीकंद पोलीस ठाण्याला वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्याचा साध्या पद्धतीत पदभार स्वीकारला आहे.

No comments