adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नंदुरबार जिल्ह्यात खळबळ! शेल्टीसह सहा ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदी योगेश सावळे; शेल्टी ची नियुक्ती रद्द करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

 नंदुरबार जिल्ह्यात खळबळ! शेल्टीसह सहा ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदी योगेश सावळे; शेल्टी ची नियुक्ती रद्द करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी न...

 नंदुरबार जिल्ह्यात खळबळ! शेल्टीसह सहा ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदी योगेश सावळे; शेल्टी ची नियुक्ती रद्द करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

शहादा तालुक्यातील शेल्टी ता.शहादा जि. नंदुरबार येथील ग्रामपंचायत प्रशासक म्हणून नियुक्त झालेले योगेश मोतीराम सावळे यांची नियुक्ती तात्काळ रद्द करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आनंदा सुकलाल कोळी यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे. या प्रकरणामुळे तालुक्यात राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

तक्रारीनुसार, योगेश सावळे हे मूळचे शेल्टी येथील रहिवासी असून गावातील राजकारणात सक्रिय सहभाग घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती मागविल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव टाकून माहिती न देण्याचे प्रकार घडल्याचा दावा अर्जदाराने केला आहे. या संदर्भात स्थानिक प्रसारमाध्यमांनीही आवाज उठविल्याचे नमूद करण्यात आले आहे.

संदर्भ म्हणून मा. उच्च न्यायालयातील जनहित याचिका (सिव्हिल पीआयएल क्र. ४७/२०२०, दि. १४/०८/२०२०) तसेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचे आदेश (दि. २३/०१/२०२६) नमूद करण्यात आले आहेत.

सहा ग्रामपंचायतींचा एकाच अधिकाऱ्याकडे कारभार?

तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, योगेश सावळे यांच्याकडे खालील सहा ग्रामपंचायतींचा प्रशासकीय पदभार देण्यात आल्याचा आरोप आहे –

१) शेल्टी

२) बामखेडा तसा

३) फेस

४) पुनसद

५) मनरद

६) भागाझिरी

आठवड्यात पाचच कामकाजाचे दिवस असताना सहा गावांचा कारभार प्रभावीपणे कसा सांभाळला जाणार, असा सवाल तक्रारदारांनी उपस्थित केला आहे.

याचबरोबर, शहादा तालुक्यातील एकूण २७ ग्रामपंचायतींसाठी सात प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रत्येकी चार ग्रामपंचायतींचा पदभार देणे अपेक्षित असताना सावळे यांच्याकडे सहा ग्रामपंचायती देण्यात आल्याने प्रशासनाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

नियुक्ती रद्द करण्याची मागणी

या सर्व बाबींचा विचार करून योगेश मोतीराम सावळे यांची शेल्टीसह संबंधित ग्रामपंचायतींवरील प्रशासक म्हणून झालेली नियुक्ती तात्काळ रद्द करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. या तक्रारीची प्रत विभागीय आयुक्त नाशिक, सचिव ग्रामविकास मंत्रालय मुंबई तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना माहितीस्तव पाठविण्यात आली आहे. तक्रारीसोबत सावळे यांचे शेल्टी येथील निवासस्थानाचे छायाचित्र व प्रशासक नियुक्ती आदेशाची प्रत जोडण्यात आली आहे.

No comments