फैजपूररात शनिवारी 'शहर पत्रकार संघा'तर्फे भव्य सत्कार सोहळा; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव इदू पिंजारी फैजपूर (संपादक ...
फैजपूररात शनिवारी 'शहर पत्रकार संघा'तर्फे भव्य सत्कार सोहळा; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर फाऊंडेशन संचालित, शहर पत्रकार संघाच्या वतीने शहरात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा शनिवार, दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता बसस्थानकासमोरील शुभदिव्य लॉन्स व मंगल कार्यालय, यावल रोड, फैजपूर येथे संपन्न होणार आहे. या भव्य कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान फैजपूर येथील संतपीठ कबीर संस्थानचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज भूषविणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन रावेर-यावल विधानसभेचे आमदार श्री. अमोलदादा जावळे आणि माजी आमदार श्री. शिरीषदादा चौधरी यांच्या शुभहस्ते होणार आहे.
या सोहळ्यात फैजपूर शहरातील समाजकारण, शिक्षण, उद्योग, वैद्यकीय सेवा, क्रीडा आणि कामगार अशा विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा 'रत्न' पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने समाजभूषण, शिक्षण सारथी, विद्याभूषण, उद्योगरत्न, राजतेजस्विनी, सेवाव्रती, धरतीपुत्र, श्रमिक कामगार, क्रीडा क्षेत्र आणि प्रेरणा मूर्ती अशा विविध पुरस्कारांनी मान्यवरांना गौरविण्यात येईल. तसेच फैजपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगरसेविकांचाही विशेष सत्कार यावेळी करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा सौ. यामिनी सराफ, उपनगराध्यक्षा सौ. छाया पाटील, मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांच्यासह अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या सोहळ्यास शहरवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वार्ता फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष योगेश सोनवणे, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र तायडे, उपाध्यक्ष राजू तडवी, सचिव शाकीर मलिक, खजिनदार प्रा. उमाकांत पाटील, प्रसिद्धी प्रमुख मयूर मेढे आणि सदस्य सलीम पिंजारी, जेष्ठ पत्रकार वासुदेव सरोदे, अरुण होल, इदू पिंजारी, संजय सराफ आणि सर्व जेष्ठ पत्रकार व सदस्यांतर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रमांनतर स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.


No comments