अंतुर्लीवासीयांनी घेतले श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रथाचे दर्शन किरण धायले मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मुक्ताईनगर तालुक्यात...
अंतुर्लीवासीयांनी घेतले श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रथाचे दर्शन
किरण धायले मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आदेशानुसार गुरुप्रतीपदा या मुहूर्तावर श्री स्वामी समर्थ महाराजांचा रथ दाखल झाला.हा रथ श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथून आला होता.या रथाचे अंतुर्ली येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात सकाळी 10 वाजता आगमन झाले त्यानंतर 10-30 वाजेची महानैवेदय आरती झाली. त्यानंतर 11-30 वाजेपासून सेवेकऱ्यांसाठी पादुका पुजन व धान्य पूजन ही सेवा होती नंतर संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत भव्य मिरवणूक काढण्यात आली .अंतुर्ली गावातील सेवेक-यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रथाचे दर्शन घेतले व पादुका पुजन, धान्न पूजन सोहळयाचा लाभ घेतला याप्रसंगी अंतुर्ली गावातील व परिसरातील सेवेकरी उपस्थित होते अशाप्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रथाचा दर्शन सोहळा व पादुका पूजन व धान्य पूजन सोहळा संपन्न झाला.


No comments