दासहरीगणू निधी लिमिटेड शेगांव वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शेगाव:- दरवर्षी प्रम...
दासहरीगणू निधी लिमिटेड शेगांव वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शेगाव:- दरवर्षी प्रमाणे दासहरीगणू निधी लिमिटेड शेगांव वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम संस्थेच्या कार्यालयात पार पडला असून या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेच्या अध्यक्षा सौं.सुनंदा गजानन फाळके, सौं.मिराताई रामरतन माळी, सौं. चेतना गजानन खेते मॅडम तसेच शेगांव शहरातील नामांकित व सदैव समाज सेवेसाठी तत्पर असलेल्या डॉ. सौं. अंजुषाताई रमेश भूतडा यांची उपस्थिती लाभली.
उपस्थित महिलांमध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व महिलांना हळदी कुंकू देण्यात आले व तीळ गूळ देण्यात आले.संस्थेच्या महिला कर्मचारी सौं. साक्षी स्वप्निल राऊत, कु. स्नेहा माळी, कु. पूजा कळंके, कु. पूजा संजय शर्मा, व संस्थेच्या संचालिका सौं. राजश्री विलास फाळके यांच्या योग्य नियोजन व परिश्रमाणे कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.


No comments