adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पाथर्डी येथे कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी

 पाथर्डी येथे कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी   अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) तेल्हारा - तालुक्यातील ...

 पाथर्डी येथे कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी  


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

तेल्हारा - तालुक्यातील पाथर्डी येथे कर्मयोगी संत गाडगे महाराज यांची जयंती भव्यदिव्यपणे साजरी करण्यात आली. शेकडो ग्रामस्थ, युवक आणि विविध स्तरांतील नागरिकांच्या उपस्थितीत हा उत्सव संपन्न झाला.कार्यक्रमाचे आयोजन स्वराज्य पक्षाचे नेते विजय नेरकर, पंडितराव कुकडे, दिवाकर कुकडे यांनी केले होते. यावेळी स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.प्रशांत डिक्कर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, “गाडगेबाबांनी केलेले कार्य अविस्मरणीय आहे. संतांचे विचार आत्मसात केल्यास माणसाचे जीवन बदलते. आपआपसात भेदभाव न करता संघटित होऊन आपल्या न्याय हक्कांसाठी एकत्रित लढा द्या. शेतकरी-शेतमजुरांच्या प्रश्नांवर तुटून पडा, हेच महापुरुषांचे खरे विचार होते.” त्यांनी गाडगेबाबांच्या सामाजिक सुधारणा, स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन आणि कर्मयोगाच्या तत्त्वांचा उल्लेख करून उपस्थितांना प्रेरणा दिली.


यावेळी जिल्हा परिषद सदस्य अनंता अवचार, पंचायत समिती सदस्य अन्ना मोहोळ, सरपंच प्रतिक्षाताई रोशन डांमरे, प्रदिप तेलगोटे,सुषमाताई कुकडे, विपुल बाहाकर, राहुल बाहाकर, सागर कळस्कार, यांच्यासह गावातील बहुसंख्य नागरिक आणि प्रचंड युवकांसह स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी  उपस्थित होते. कार्यक्रमात संत गाडगेबाबांच्या विचारांचे स्मरण करून सामाजिक एकता आणि शेतकरी हिताच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.संत गाडगेबाबा हे स्वच्छता, समाजसुधारणा आणि लोकसेवेचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण भागात अशा कार्यक्रमांमुळे त्यांच्या विचारांचा प्रसार होत असल्याचे चित्र पाथर्डी येथे दिसून आले.

No comments