अन्यायग्रस्त जनतेचे व्यासपीठ संघटनेचा दणका;इशाऱ्यानंतर रस्त्यावरील लाकूड हटविले अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकापूर...
अन्यायग्रस्त जनतेचे व्यासपीठ संघटनेचा दणका;इशाऱ्यानंतर रस्त्यावरील लाकूड हटविले
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर: अन्यायग्रस्त जनतेचे व्यासपीठ या संघटने कडून दिनांक 14 जानेवारी रोजीतहसील चौक ते परपेट भागातील रस्त्यावरील अतिक्रमण तात्काळ हटवण्याची मागणी केली होती. विस दिवस उलटून सुद्धा प्रशासनाकडून कर्तव्य शून्य असा कारभार असल्याने संतापलेल्या संघटनेतील सभासदांकडून प्रशासनाला स्मरणपत्र देत प्रशासन व त्यातील अधिकारी यांनी कर्तव्यात कसूर व विलंब या कारणाखाली वरिष्ठांकडे तक्रार, माननीय लोकायुक्तांकडे तक्रार,उपोषण, आंदोलने, कायदेशीर नोटीस,रिट पिटीशन यावा अशा अनेक कायदेशीर व लोकशाही मार्गांचा वापर मागण्या मान्य न झाल्यास करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. इशारा देताच तात्काळ चार खंबा चौक ते वल्ली चौक परिसरातील रस्त्यावरील असणारा अवैध लाकूड साठा तात्काळ हटविण्यात आला. मात्र अद्याप पर्यंत तहसील चौक ते चारखंबा चौक तसेच वल्लीचौक ते पारपेट भागातील उड्डाणपूल यावरील अतिक्रमण व बेशिस्त वाहन पार्किंग यांवर कारवाई होणे तूर्तास बाकी आहे.


No comments