हरेगांवफाटा ओव्हरब्रिजवरील वाढत्या अपघातांवर उपाय योजना करण्यासाठी भारतीय लहुजी सेनेचे उपोषण सुरू श्रीरामपूर / प्रतिनिधी: (संपादक -:- हेमक...
हरेगांवफाटा ओव्हरब्रिजवरील वाढत्या अपघातांवर उपाय योजना करण्यासाठी भारतीय लहुजी सेनेचे उपोषण सुरू
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
श्रीरामपूर- नेवासा रोडवरील हरेगांव फाटा येथे असलेल्या ओव्हरब्रिजवर सातत्याने होत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर तातडीने उपाययोजना करण्यात यावी या मागणीसाठी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने सोमवारी दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी पासून उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.
यापूर्वी या गंभीर प्रश्नाबाबत भारतीय लहुजी सेनेने प्रशासनाला निवेदन देऊन संबंधित बाभी वेळ दिला होता. मात्र प्रशासनाकडून कुठलीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे. नेवासा रोडवरील हरेगांव फाटा येथील ओव्हरब्रिज हा अपघातप्रवण ठिकाण असून याठिकाणी वारंवार गंभीर अपघात घडत आहेत. त्यामुळे या ठिकाणी तातडीने संरक्षक कठडे, सूचना फलक, रस्त्याची दुरुस्ती तसेच वाहतूक नियंत्रण व्यवस्था लागू करावी, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली आहे.
या उपोषणामध्ये भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय सचिव हनीफभाई पठाण, राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राजेंद्र त्रिभुवन, अल्ताफ शेख, रमीज पोपटिया, नंदकुमार बागडे, सिकंदर तांबोळी, रमजान शेख, हाजी गफ्फारभाई पोपटिया, सलीम मेमन, मच्छिंद्र साळुंखे, संदीप शेडगे, राजु कडू, तात्यासाहेब सोनवणे, सतीश लोखंडे, मेहमूद पठाण, नागेश साथे, सलमान पठाण, अण्णा कुऱ्हाडे, रोहन परदेशी, सागर चापनेरकर रज्जाक भाई शेख आरपीआयचे सुभाष त्रिभुवन यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले आहेत. या उपोषणास विविध सामाजिक संघटना व नागरिकांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी आंदोलकांच्या वतीने देण्यात आला आहे.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

No comments