धरणगावात महाशिवरात्रीनिमित्त अमरनाथ बर्फानी बाबा गुफा भव्य शिवलिंग दर्शन विकास पाटील धरणगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) धरणगाव : धरणगावा...
धरणगावात महाशिवरात्रीनिमित्त अमरनाथ बर्फानी बाबा गुफा भव्य शिवलिंग दर्शन
विकास पाटील धरणगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धरणगाव : धरणगावात महाशिवरात्रीनिमित्त ओम शांती केंद्राच्या आवारात प्रथमच ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय मार्फत अमरनाथ बर्फानी बाबा गुफा यांचे भव्य शिवलिंग दर्शन तयार करण्यात आलेले आहे आज या गुफाचे पूजन व आरतीच्या मान धरणगावच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ लीलाताई सुरेश चौधरी नगरसेवक विलास महाजन सौ कल्पना महाजन, नगरसेवक मच्छिंद्र पाटील ,पत्रकार धर्मराज मोरे ,पत्रकार डी एस पाटील, पत्रकार भगीरथ माळी ,संजय महाजन व केंद्राच्या संचालिका नीता दीदी कल्याणी दीदी वैशाली दीदी वर्षा दीदी रामकृष्ण भाई बीके भाई देवानंद भाई छोटूभाई एकनाथ भाई विनोद भाई इतर मान्यवरांच्या हस्ते पूजन व आरती करण्यात आली
धरणगावात प्रथमच ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय तर्फे महाशिवरात्री निमित्त अमरनाथ बर्फानी बाबा गुफाचे भव्य शिवलिंग दर्शन तयार केले आहे तरी दर्शन घेण्यासाठी भाविकांनी उपस्थित राहावे तीन दिवस दर्शन होणार आहे अशी माहिती ओम शांती केंद्राच्या संचालिका निता दीदी यांनी सांगितले व त्यांनी सर्व प्रमुख मान्यवरांचे स्वागत केलेओम शांती केंद्रामार्फत दरवर्षी वेगवेगळ्या स्वरूपात शिवलिंगाचे दर्शन नागरिकांसाठी करण्यात येते या केंद्रावर सातत्याने भक्ती भाव आणि प्रबोधनाचे कार्यक्रम होत असतात

No comments