adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नर्मदा परिक्रमा पूर्ण करून एकनाथ भिकारी पाटील (माऊली) यांचे घोडगावात आगमन; १५-१६ फेब्रुवारीला धार्मिक सोहळ्यांचे आयोजन

 नर्मदा परिक्रमा पूर्ण करून एकनाथ भिकारी पाटील (माऊली) यांचे घोडगावात आगमन; १५-१६ फेब्रुवारीला धार्मिक सोहळ्यांचे आयोजन   चंद्रकांत पाटील वि...

 नर्मदा परिक्रमा पूर्ण करून एकनाथ भिकारी पाटील (माऊली) यांचे घोडगावात आगमन; १५-१६ फेब्रुवारीला धार्मिक सोहळ्यांचे आयोजन  


चंद्रकांत पाटील विचखेडा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

“नर्मदे हर” च्या जयघोषात नर्मदा परिक्रमा यशस्वीरीत्या पूर्ण करून श्री. एकनाथ भिकारी पाटील (माऊली) सुखरूप घरी परतले असून त्यांच्या स्वागतार्थ घोडगाव येथे १५ व १६ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक उत्साहाने ओतप्रोत असलेल्या या सोहळ्यात ग्रामस्थांसह भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

१५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून रात्री ८.३० वाजता ह.भ.प. कुणाल महाराज खडकदेवळा यांचे कीर्तन होणार आहे.

१६ फेब्रुवारी रोजी श्री सत्यनारायण महापूजा व कन्यापूजनाचा कार्यक्रम पार पडणार असून सकाळी ९.३० वाजता ह.भ.प. डॉ. सुशील महाराज विटनेर यांचे कीर्तन होईल. तसेच सकाळी ११ वाजल्यापासून महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

सदर सर्व कार्यक्रम विठ्ठलेश्वर महादेव मंदिर, घोडगाव येथे संपन्न होणार आहेत. या पावन आनंदसोहळ्यात कुटुंबासह उपस्थित राहून नर्मदा मातेचा कृपाशीर्वाद घ्यावा, ही नम्र विनंती पाटील परिवार, घोडगाव यांनी केली आहे. तसेच कार्यक्रमास येताना कोणत्याही प्रकारचा आहेर आणू नये, असेही आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

No comments