adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

राज्यस्तरीय बेल्ट रेसलिंग स्पर्धेत कृष्णा महाजनची दमदार कामगिरी ; इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचा गौरव

 राज्यस्तरीय बेल्ट रेसलिंग स्पर्धेत कृष्णा महाजनची दमदार कामगिरी ; इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचा गौरव  विकास पाटील धरणगाव (संपादक -:- ह...

 राज्यस्तरीय बेल्ट रेसलिंग स्पर्धेत कृष्णा महाजनची दमदार कामगिरी ; इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचा गौरव 


विकास पाटील धरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धरणगाव : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर व तालुका क्रीडा संकुल, नेवासा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय बेल्ट रेसलिंग स्पर्धा नेवासा येथे मोठ्या उत्साहात व थाटामाटात पार पडल्या. या स्पर्धेत राज्यातील विविध विभागांतील खेळाडूंनी सहभाग नोंदवून आपली ताकद व कौशल्य सादर केले.

या राज्यस्तरीय स्पर्धेत इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, धरणगाव (इयत्ता ११ वी विज्ञान) शाखेचा विद्यार्थी कृष्णा गोरख महाजन याने ओपन वजन गटात जबरदस्त संघर्ष करत प्रतिस्पर्धींना पराभूत केले. आपल्या चिकाटी, दमदार तंत्र व जिद्दीच्या जोरावर कृष्णाने द्वितीय क्रमांक पटकावून राज्यस्तरावर महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले.


या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने चेअरमन डी.जी. पाटील, सचिव सी.के. पाटील व संचालक मंडळाने कृष्णाचे अभिनंदन केले. तसेच प्राचार्या. सुरेखा पाटील,पर्यवेक्षक ए.एस.पाटील व क्रीडा शिक्षक डी.एन. पाटील यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाचा या यशात मोठा वाटा असल्याचे नमूद करण्यात आले. कृष्णाला पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी सर्व स्तरांतून हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. 


No comments