adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

हातेड येथे स्व.मा.ना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ शोकसभा संपन्न

हातेड येथे स्व.मा.ना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ शोकसभा संपन्न   चंद्रकांत पाटील विचखेडा/ शामसुंदर सोनवणे (संपादक -:- हेमक...

हातेड येथे स्व.मा.ना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ शोकसभा संपन्न  


चंद्रकांत पाटील विचखेडा/ शामसुंदर सोनवणे

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

महाराष्ट्राचे सर्वसामान्यांचे लाडके, कर्तव्यदक्ष.एक दमदार आणि कामाचाच माणूस म्हणून आपल्या दादाची ओळख पण नीतीने आपल्याकडून आपला दादा हिराहून घेतला. अशा स्वर्गीय. मा. ना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानिमित्त आयोजित करण्यात आलेली शोकसभा बुधवार, दिनांक ०४ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, हातेड येथे शांततेत व भावनिक वातावरणात संपन्न झाली.

या शोकसभेला हातेड परिसरासह समस्त पंचक्रोशीतील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी स्व. .मा.ना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. दोन मिनिटांचे मौन पाळून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन हातेड परिसर व समस्त पंचक्रोशी यांच्या वतीने करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमास मा.ना. अरुणभाई गुजराती, मा.आ.दिलीपराव सोनवणे, ॲड. सुरेश सोनवणे,  नारायण पाटील (रुखनखेडा), डॉ. पांडुरंग पाटील (हातेड), प्रभाकर पाटील, साहेबराव पाटील (भार्डू), भाऊसाहेब पाटील (धुपे), राजेंद्र सोनवणे (हातेड), पुरुषोत्तम बाविस्कर (हातेड), चंद्रकांत पाटील (विचखेडा), छोटू बाविस्कर (हातेड खु.), बाळकृष्ण सोनवणे (भार्डू), देवेंद्र सोनवणे (हातेड बु!)रमेश सोनवणे (हातेड खु.), चंद्रकांत सोनवणे (हातेड खु.), अनिल सोनवणे, सुनील पाटील (हातेड खु.), एस. डी. सोनवणे (भार्डू), भरत बाविस्कर (वडगाव), विक्की डॉक्टर (हातेड), गणेश पाटील (मालखेडा), मिलिंद पाटील, संदीप (पप्पू) सोनवणे (भार्डू), दीपक सोनवणे (हातेड), शशीकांत देवरे (अनवर्दे), वासुदेव बाविस्कर (हातेड खु), एस. बी. पाटील व बाळकृष्ण पाटील (गणपूर), सुरेश धनगर (चहार्डी), सुनील पाटील (वाळकी), विठू सर (घोडगाव), शशीकांत पाटील (मालखेडा), करिष्मा दिदी, मंगला दिदी, ओम शांती परिवार, शालिनीताई सोनवणे (सरपंच हातेड खु)हभप संजीव सोनवणे, हभप माधुरीताई सोनवणे गलवाडे, देविदास सोनवणे (हातेड), इंदिराताई पाटील (विटनेर) व विजयाताई पाटील (वडगाव) शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हातेड व पंचक्रोशीतील सर्व नागरिक  आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समारोप पसायदानाने झाला.

No comments