adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा नगरपरिषदेत अत्याधुनिक स्वच्छता मशिनरीचे लोकार्पण आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते स्वच्छ भारत अभियानाला नवी गती

 चोपडा नगरपरिषदेत अत्याधुनिक स्वच्छता मशिनरीचे लोकार्पण आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते स्वच्छ भारत अभियानाला नवी गती  चोपडा प्रतिनिधी ...

 चोपडा नगरपरिषदेत अत्याधुनिक स्वच्छता मशिनरीचे लोकार्पण

आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते स्वच्छ भारत अभियानाला नवी गती 


चोपडा प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा : शहरातील स्वच्छता व्यवस्थापन अधिक सक्षम, परिणामकारक व तांत्रिकदृष्ट्या प्रगत करण्याच्या उद्देशाने चोपडा नगरपरिषद मार्फत नव्याने खरेदी करण्यात आलेल्या अत्याधुनिक स्वच्छता मशिनरीचे लोकार्पण आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या उपक्रमामुळे शहराच्या स्वच्छता व्यवस्थेला नवी दिशा मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमास नगराध्यक्षा नम्रता पाटील, उपनगराध्यक्ष  पंकज बोरोले, सर्व सभापती, नगरसेवक-नगरसेविका, मुख्याधिकारी, विभागप्रमुख तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाढणारे कचऱ्याचे प्रमाण लक्षात घेता स्वच्छ भारत अभियान अंतर्गत प्राप्त झालेल्या या मशिनरीमुळे रस्ते सफाई, नालेसफाई, कचरा संकलन व वाहतूक तसेच सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता अधिक जलद, सुरक्षित आणि कार्यक्षम पद्धतीने करता येणार आहे. यामुळे मनुष्यबळावरील ताण कमी होऊन कामकाजात गती व गुणवत्ता वाढणार आहे. 


आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात नगरपरिषदेच्या उपक्रमांचे कौतुक करताना सांगितले की, “स्वच्छ शहर हीच खरी प्रगतीची ओळख आहे. स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. नवीन मशिनरीच्या माध्यमातून चोपडा शहर स्वच्छतेत आदर्श निर्माण करेल. ”नगराध्यक्षा नम्रता पाटील यांनीही विविध स्वच्छता उपक्रमांची माहिती देत प्रशासन व नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नातूनच शहर स्वच्छ आणि सुंदर राहू शकते, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांनी नागरिकांना कचरा योग्य ठिकाणी टाकण्याचे, ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे तसेच शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले.

“स्वच्छ चोपडा – सुंदर चोपडा” हा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

No comments