adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अंमली पदार्थांवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई..स्कॉर्पिओसह लाखोंचा गांजा जप्त..!

 अंमली पदार्थांवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई..स्कॉर्पिओसह लाखोंचा गांजा जप्त..!   सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ...

 अंमली पदार्थांवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई..स्कॉर्पिओसह लाखोंचा गांजा जप्त..! 


 सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:-  येथील मिरजगाव येथे दोन आरोपी व अंमली पदार्थ गांजासह एकुण 25 लाख 43,000/-रुपये किंमतीच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात आले असून ही धडक कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांनी अंमली पदार्थ विक्री करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे.सदर आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नोडल अधिकारी तथा पो.नि.श्री. किरणकुमार कबाडी,स्थानिक गुन्हे शाखा यांनी अंमली पदार्थ विक्री व सेवन करणारे इसमांची माहिती काढून कारवाई करणे बाबत पोउपनि/समीर अभंग, पोलीस अंमलदार ह्रदय घोडके, संतोष खैरे,दिपक घाटकर, लक्ष्मण खोकले,बिरप्पा करमल, श्यामसुंदर जाधव,भिमराज खर्से, राहुल डोके,भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर,प्रशांत राठोड मनोज साखरे,चालक अरुण मोरे,उमाकांत गावडे यांना रवाना केले.सदर पथक हे मिरजगाव पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थबाबत माहिती घेत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत स्कॉर्पीओ गाडी क्रमांक एम.एच.14 जी. एच.2330 ही मधुन दोन इसम अंमली पदार्थ गांजा विक्री करीता कर्जत येथुन पाथर्डीकडे जाणार असल्याची माहिती मिळाली. सदरची बातमी पोनि.श्री.कबाडी यांना कळविले असता त्यांनी मिरजगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.त्यानुसार पथकाने तात्काळ मिरजगाव पोलीस स्टेशन येथे जावुन सपोनि/विजय झंजाड यांना मिळालेल्या बातमीचा लेखी रिपोर्ट दिला असता त्यानुसार सपोनि/विजय झंजाड यांचेसह कारवाई करण्याकरीता आवश्यक त्या साहित्यासह पोलीस स्टेशन मधुन सरकारी वाहनाने निघुन मिरजगाव ते कर्जत जाणारे रोडवरील ब्रिजखाली महात्मा फुले चौक येथे जावुन सापळा रचुन थांबले.

बातमीतील नमुद स्कॉर्पीओ गाडी येतांना दिसताच पथकाने गाडी थांबवुन पाहणी केली असता त्यामध्ये दोन इसम बसलेले दिसुन आले. त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नांव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नांवे 1) गणेश अंकुश कराड वय - 32 वर्षे रा. आगसखांड, ता. पाथर्डी जि.अहिल्यानगर, 2) सुखदेव शिवनाथ कदम वय -30 वर्षे रा. सदर असे असल्याचे सांगितले.

सपोनि/ विजय झंजाड यांनी बातमीची हकिगत सांगुन त्यांचे व स्कॉर्पीओ गाडीची झडती घेतली असता गाडीचे डिक्कीमध्ये 04 गोण्या मिळुन आले. नमुद इसमांना गोण्या बाबत विचारपुस करता त्याने त्यामध्ये अंमली पदार्थ गांजा असल्याचे सांगितले आहे.ताब्यातील आरोपीतांचे ताब्यातुन 18,18,000/-रु कि.चा 132.84 किलो ग्रॅम गांजा अंमली पदार्थ, 25,000/-रु कि.चे दोन मोबाईल, 7,00,000/-रु कि.चा एक स्कॉर्पीओ चारचाकी वाहन असा एकुण 25,43,000/-रु कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.ताब्यात घेतलेल्या आरोपी विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेचे पोकॉ/800 भाऊसाहेब राजु काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मिरजगाव पोलीस स्टेशन गु. र. नं. 60/2026 गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन 1985 चे कलम 8 (क), 20(ब)ii(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास मिरजगाव पोलीस स्टेशन करीत आहे.

No comments