adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्व. निखिलभाऊ खडसे सेमी इंग्लिश स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

 स्व. निखिलभाऊ खडसे सेमी इंग्लिश स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी  शामसुंदर सोनवणे वि.प्र. (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मुक्ताईनगर: – अखंड...

 स्व. निखिलभाऊ खडसे सेमी इंग्लिश स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी 


शामसुंदर सोनवणे वि.प्र.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मुक्ताईनगर: – अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी स्व. निखिलभाऊ खडसे सेमी इंग्लिश स्कूल, मुक्ताईनगर येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. 


कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे प्राचार्य व्ही. के. वडस्कर सर तसेच सर्व शिक्षक-शिक्षिकांनी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले. वातावरणात शिवमय ऊर्जा आणि प्रेरणादायी भावनांचा उत्स्फूर्त आविष्कार पाहायला मिळाला.

जयंतीनिमित्त नर्सरी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, जिजामाता तसेच मावळ्यांचे आकर्षक पोशाख परिधान करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. लहानग्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. पाचवी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी शिवजयंतीनिमित्त गीते, प्रभावी भाषणे, पोवाडे सादर करून महाराजांच्या शौर्यगाथा उजाळल्या. यावेळी निबंध स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. तर इ. 9 विच्या विदयार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराजांची हुबेहूब प्रतिमा चित्रीकरण केले होते. 

प्राचार्य व्ही. के. वडस्कर सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी भाषण करून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, शौर्य आणि स्वाभिमानाची जाणीव जागृत केली. शिक्षक स्वप्नील चौधरी सर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश गायकवाड सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन शुकलोधन बोदडे सर यांनी मानले.

“जय भवानी! जय शिवाजी!” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि शिवमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments