adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महाअंकुर फार्मर प्रो. कंपनीला खान्देश कृषी संस्कृती प्रदर्शनात सन्मान

 महाअंकुर फार्मर प्रो. कंपनीला खान्देश कृषी संस्कृती प्रदर्शनात सन्मान  चोपडा  प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) महाराष्ट्र शासनाच्या क...

 महाअंकुर फार्मर प्रो. कंपनीला खान्देश कृषी संस्कृती प्रदर्शनात सन्मान 


चोपडा  प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग जळगाव व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), जळगाव यांच्या वतीने कृषी क्षेत्रात सन २०२४–२५ या कालावधीत केलेल्या उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाअंकुर फार्मर प्रोड्युसर कंपनी लि., घाडवेल (ता. चोपडा, जि. जळगाव) यांना खान्देश कृषी संस्कृती व पशु प्रदर्शन, जळगाव येथे सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.

गट शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे संघटन, शेतमालाचे मूल्यवर्धन तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी केलेल्या कार्याची शासन स्तरावर प्रशंसा करण्यात आली. या सन्मानामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला असून भविष्यात अधिक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास प्रेरणा मिळाली आहे. या गौरवाबद्दल महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग तसेच आत्मा यंत्रणेतील मार्गदर्शक अधिकारी व पदाधिकारी मंडळींप्रती महाअंकुर फार्मर प्रो. कंपनीच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

No comments