सहकार भारती सदस्य नोंदणी अभियानात सहभागी व्हावे:- राजदत्त पांडे यांचे आवाहन इदू पिंजारी फैजपुर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर सहका...
सहकार भारती सदस्य नोंदणी अभियानात सहभागी व्हावे:- राजदत्त पांडे यांचे आवाहन
इदू पिंजारी फैजपुर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर सहकार भारती संपूर्ण देशात राष्ट्रीय स्तरावर सहकार क्षेत्राचे विकासासाठी मोठे सांघिक कार्य करीत आहे या सहकार भारती संघाचे सभासदत्व सर्वासाठी खुले असून या सभासद नोंदणी अभियानात सहकारी संस्था सहकार क्षेत्रातील जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन सहकार भारती सोसायटी विभागाचे राष्ट्रीय सहकार भारती प्रमुख इफको संस्थेचे संचालक राजदत्त पांडे यांनी न्हावी येथे आयोजित सभेत केले
जळगाव जिल्हा सहकार भारती व यावल तालुका कार्यकर्ता सभा जे टी महाजन फ्रुटसेल सोसायटी चे सभागृहात सभा अध्यक्ष राष्ट्रीय मंत्री दिलीप रामू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सम्पन्न झाली
सभेचे प्रास्ताविक व स्वागतपर मनोगत फ्रुटसेल सोसायटी चेअरमन शरद महाजन यांनी केले सहकार भारती जिल्हा अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी न्हावी गाव सहकाराचे ऊर्जा स्थान असून जिल्ह्याच्या सहकाराचे प्रेरणास्थान आहे हे सांगून सहकार भारतीचे जिल्ह्यातील कार्याचा आढावा घेऊन स्व दादासाहेब जे टी महाजन यांनी सहकार क्षेत्रात केलेले समर्पित कार्याचा गौरव केला
कार्यक्रम शुभारंभ वेळी जे टी महाजन यांचे पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मान्यवर पाहुण्यांनी अभिवादन केले अध्यक्षीय भाषणात दिलीप पाटील यांनी सहकार चळवळ मजबूत निर्दोष वाढीसाठी सहकार भारती प्रयत्न करीत आहे संघटना मजबुती साठी सर्वांनी व संस्थांनी सभासद होऊन सहकार्य करावे असे कळकळीचे आवाहन केले एफ पी ओ चे राज्य प्रमुख अमृतकर यांनी केळी मार्केटिंग साठी कोल्ड स्टोरेज उभारणे गरजेचे असून एफ पी ओ तर्फे सहकारी संस्था नि पुढाकार घ्यावा यासम्बधी केंद्र व राज्य सरकार च्या योजना तपशील त्यांनी आपले मनोगतात व्यक्त केला सूत्र संचालन महामंत्री शशिकांत बेहडे यांनी केले सभेस सहकार भारती चे पदाधिकारी संध्या देशमुख प्रमोद नगरकर जयदीप शहा
अनिता वाणी मनीषा आवारे नारायण भुसारी तालुका अध्यक्ष महेश गडे वि का चेअरमन प्रवीण वारके मल्टी सोसायटी चेअरमन भानुदास चोपडे दूध संस्था व्हा चे पराग वाघूलडे उमेश बेंडाळे सागर फिरके रवींद्र फिरके चंद्रशेखर चौधरी किरण चौधरी काशिनाथ वारके सुजय महाजन सुभाष भंगाळे भोजराज बोरोळे यासह फ्रुटसेल सोसायटी वि का सो दूध सोसायटी चे संचालक उपस्थित होते धनंजय फिरके सर नितीन चौधरी हर्षद महाजन गोटू फिरके यांनी परिश्रम घेतले

No comments