गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित, खदिजा इंग्लिश मिडीयम व खातून अब्दुल्लाह सेकंडरी विद्यालयात १० वी 'निरोप समारंभ' उत्साहात चिपळूण...
गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित, खदिजा इंग्लिश मिडीयम व खातून अब्दुल्लाह सेकंडरी विद्यालयात १० वी 'निरोप समारंभ' उत्साहात
चिपळूण (वार्ताहर):-
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित, खदिजा इंग्लिश मिडीयम व खातुन अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल गोवळकोट विद्यालयात नुकताच इयत्ता दहावीचा निरोप समारंभ संपन्न झाला.
यावेळी विद्यालयाचे विद्यमान चेअरमन डॉ. इसहाक खतीब यांनी अध्यक्षस्थान भुषविले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. इरफान शेख यांनी प्रास्ताविक केले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी भाषण करताना भावनाशील होऊन आपल्या वर्षभरातल्या आठवणींना उजाळा दिला. इयत्ता ९ वी तील विद्यार्थ्यांनी दहावीतील सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
विद्यालयाचे माध्यमिक शिक्षक व इयत्ता नववीचे वर्गशिक्षक श्री जावेद मिया मुल्ला यांनी विद्यार्थ्यांना प्रबोधित करताना दहावीची परीक्षा ही आयुष्याची सुरुवात आहे आपलं व्यक्तिमत्व कसं घडवावं. इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये उज्वल यश करण्यासाठी कठोर परिश्रम घेऊन आपण स्वतःचे व संस्थेचे तसेच शाळेचे नाव उज्वल करावे अशा शुभेच्छा देऊन मार्गदर्शक केले.
संस्थेचे विद्यमान सदस्य श्री.लियाकत खतीब यांनी उत्तम विद्यार्थी घडण्यासाठी कठोर परिश्रम घेणे बंधनकारक आहे. उज्वल या संपादन करून आपल्या आई-वडिलांचे नाव तसेच प्रशालेचे नाव उज्वल करावे अशा शुभेच्छा देत. उपस्थितांना संबोधित केले
संस्थेचे चेअरमन डॉ. इसहाक खतीब यांनी सर्व विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. परिक्षा कालावधीत सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेऊन उत्तमरित्या परिक्षेला सामोरे जावे व उज्ज्वल यश संपादन करावे. उज्वल भवितव्य घडविण्यासाठी कठोर परिश्रम मेहनत घेणे आवश्यक आहे असे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केले.
शेवटी कार्यक्रम प्रसंगी शॉर्ट फिल्म द्वारे विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.इरफान शेख यांनी विद्यार्थी व्यक्तिमत्व कसा घडवावा या संदर्भात व्हिडिओ प्रसारित केले. दहावीचे वर्ग शिक्षक म्हणून श्री. इम्रान महत यांनी दहावी विद्यार्थी यांच्या कार्यक्रमाचे नियोजन केले.
कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे चेअरमन डॉ. इसहाक खतीब, व्हा.चेअरमन श्री. जफर कटमाले, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. ऊरुसा खतीब, सेक्रेटरी खजिनदार श्री.जहीर नाखुदा ,संस्थेचे सदस्य श्री.लियाकत खतीब, संस्थेचे सदस्य श्री.सूजा मुकादम सौ.नादिया खतीब, सौ.नुरी हळदे , सदस्या सौ.शिरीन पटेलतसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.इरफान शेख, वरिष्ठ लिपीक श्री. हेमंत भैरवकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदि उपस्थित होते.


No comments