adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जळगाव जिल्हा भारत स्काऊट्स् आणि गाईड्सतर्फे प्राथमिक व प्रगत स्काऊट मास्टर प्रशिक्षण यशस्वीपणे संपन्न

 जळगाव जिल्हा भारत स्काऊट्स् आणि गाईड्सतर्फे प्राथमिक व प्रगत स्काऊट मास्टर प्रशिक्षण यशस्वीपणे संपन्न   जळगाव  जिल्हा प्रतिनिधी – समाधान पा...

 जळगाव जिल्हा भारत स्काऊट्स् आणि गाईड्सतर्फे प्राथमिक व प्रगत स्काऊट मास्टर प्रशिक्षण यशस्वीपणे संपन्न  


जळगाव  जिल्हा प्रतिनिधी – समाधान पाटील

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

विद्यार्थ्यांमध्ये स्काऊटिंगची आवड निर्माण होऊन त्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध पुरस्कारांसाठी सक्षमपणे घडवता यावे, या उद्देशाने जळगाव जिल्हा भारत स्काऊट्स् आणि गाईड्स जिल्हा संस्थेमार्फत आयोजित सात दिवसीय प्राथमिक व प्रगत स्काऊट मास्टर प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न झाले. हे निवासी प्रशिक्षण शिबिर दिनांक २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत जिल्हा संस्था कार्यालय, जळगाव येथे पार पडले. या शिबिरात जळगाव जिल्ह्यातील विविध शाळांमधील स्काऊट मास्टर (शिक्षक) मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रशिक्षणादरम्यान जिल्हा कार्यालयाशेजारील महेश प्रगती मंडळाच्या बालवाडीच्या मैदानावर तंबू उभारून प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष स्काऊटिंगचा अनुभव देण्यात आला. सात दिवस चाललेल्या या शिबिरात तंबू सजावट, मागाच्या खुणांच्या साहाय्याने मार्ग शोधणे, जंगल रात्र सहल (नाईट हाइक), बौद्धिक सत्रे, मनोरंजनात्मक खेळ, स्काऊट गीते तसेच रात्री रंगलेला शेकोटी (कॅम्पफायर) कार्यक्रम अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कॅम्पफायर कार्यक्रमात शिक्षकांनी आपल्या कला व कौशल्यांचे सादरीकरण करून कार्यक्रमात विशेष रंगत आणली.

शिबिराच्या संचालिका सौ. वैशाली अवथळे व शिबिर प्रमुख श्री. रवींद्र कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण यशस्वीपणे पार पडले. यावेळी श्री. जी. यु. पवार, श्री. आर. सी. गोसावी, श्री. एस. एन. सोनवणे, श्री. के. एम. पाटील, डॉ. व्ही. एस. पाटील, सौ. एस. वाय. भोळे आणि सौ. रत्ना बागुल या तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन प्रशिक्षणार्थींना लाभले.

दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी माननीय उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेली यांच्या अध्यक्षतेखाली स्काऊट मास्टर दीक्षा समारंभ पार पडला. यावेळी स्काऊट गाईड सचिव सौ. सरलाताई पाटील, सहसचिव श्री. डी. एस. सोनवणे, मुख्याध्यापक श्री. व्ही. एस. तायडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस. आर. राठोड यांनी केले, तर स्काऊट मास्टर प्रशिक्षक श्री. टी. टी. सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी नवीन नेमाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

शिबिराच्या शेवटच्या दिवशी दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सामुदायिक सर्वधर्म प्रार्थना घेण्यात आली. विविध धर्मांच्या प्रार्थना सामूहिकरित्या म्हणण्यात आल्या. त्यानंतर स्काऊट गाईड ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच सर्व तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षकांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. यावेळी मार्गदर्शक व प्रशिक्षणार्थी स्काऊट मास्टर शिक्षकांनी आपले अनुभव व मनोगत व्यक्त करताना भावनिक आठवणींना उजाळा दिला. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले, अशा भावनिक वातावरणात या प्रशिक्षण शिबिराचा यशस्वी समारोप झाला.

No comments