adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जालना येथील CTMK गुजराती शाळेतील १३ वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार; स्वतंत्र चौकशीची मागणी

 जालना येथील CTMK गुजराती शाळेतील १३ वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार; स्वतंत्र चौकशीची मागणी  जालना  प्रतिन...

 जालना येथील CTMK गुजराती शाळेतील १३ वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार; स्वतंत्र चौकशीची मागणी 


जालना  प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड) 

जालना येथील CTMK गुजराती शाळेत इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या १३ वर्षीय विद्यार्थिनी आरोही दीपक बिडलान (रा. मस्तगड, जालना) यांच्या मृत्यू प्रकरणी सामाजिक कार्यकर्ता राहुल सत्यनारायणजी करनाडे यांनी आज, दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवक–जावक विभागात लेखी तक्रार अर्ज दाखल केला आहे. या अर्जात सदर घटनेची तात्काळ स्वतंत्र आणि सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, दि. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० ते ८.०० वाजेदरम्यान शाळेच्या इमारतीत घडलेल्या घटनेत विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत विद्यार्थिनीच्या वडिलांनी शाळेतील काही शिक्षकांकडून मानसिक तणाव, छळ व बुलिंग झाल्याचे आरोप केले असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

तसेच, शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीची भिंत अत्यंत कमी उंचीची (अंदाजे एक फूट) असून, संरक्षक जाळी अथवा ग्रिल नसणे ही गंभीर सुरक्षा त्रुटी असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास सदर बाजार पोलीस स्टेशन येथे सुरू असून पोलीस निरीक्षक संदीप भारती तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

तक्रार अर्जात भारताच्या संविधानातील अनुच्छेद २१ (जीवनाचा हक्क), २१A (शिक्षणाचा हक्क) तसेच RTE कायदा यांचा हवाला देत शाळांमध्ये सुरक्षित व तणावमुक्त वातावरण देणे ही प्रशासन व शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय जुवेनाइल जस्टिस कायदा आणि NCPCR च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार बालकांच्या मानसिक आरोग्य व सुरक्षेची जबाबदारी निश्चित असल्याचेही तक्रारीत अधोरेखित करण्यात आले आहे. प्रकरणाच्या स्वरूपानुसार भा.दं.वि. कलम ३०६ अंतर्गत संभाव्य कारवाईची मागणीही करण्यात आली आहे.

या तक्रारीतून प्रशासनाकडे पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत—

घटनेची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमावी, ज्यामध्ये बालकल्याण समिती (CWC), मानसोपचार तज्ज्ञ आणि पोलीस यांचा समावेश असावा; शाळेतील सुरक्षा त्रुटींची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी; मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबाला दयाळू नोकरी तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ ते १० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी; तसेच जिल्ह्यातील सर्व शाळांचे सुरक्षा ऑडिट, मानसिक आरोग्य कक्ष स्थापन करणे आणि बुलिंग प्रतिबंध कार्यक्रम राबविण्याचे निर्देश द्यावेत.

यावेळी अर्जदार राहुल करनाडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, “ही घटना बालहक्क आणि शाळा सुरक्षेच्या गंभीर उल्लंघनाची आहे. प्रशासनाने तात्काळ ठोस कारवाई केली नाही, तर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा विचार करावा लागेल.” यावेळी विजय ओमप्रकाश भगत उपस्थित होते.

No comments