एन.एफ.ई. मिशन स्कूल, चोपडा येथे विदेशी पाहुण्यांकडून छायाचित्रकार छोटू वारडे यांचा गौरव चंद्रकांत पाटील विचखेडा (संपादक -:- हेमकांत गायक...
एन.एफ.ई. मिशन स्कूल, चोपडा येथे विदेशी पाहुण्यांकडून छायाचित्रकार छोटू वारडे यांचा गौरव
चंद्रकांत पाटील विचखेडा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा येथील एन.एफ.ई. मिशन स्कूलमध्ये भेटीवर आलेल्या विदेशी नागरिकांच्या हस्ते शहरातील ज्येष्ठ पत्रकार व राज्यस्तरावर गौरवलेले छायाचित्रकार छोटू उर्फ भगवान भाऊलाल वारडे यांचा दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सन्मान करण्यात आला. नॉर्वे, स्वीडन व डेन्मार्क येथील शिक्षणप्रेमी नागरिक विनी गुलबअँडसन, फॅन्ड्रीक, निकलास, लाईफ विग, मॉर्डर्न, आणणे, होको आदी मान्यवरांनी शाळेला भेट दिली होती. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलागुणांच्या प्रदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमानंतर बक्षीस वितरण समारंभ पार पडला. याच वेळी उपस्थित विदेशी पाहुण्यांच्या हस्ते छोटू वारडे यांचा विशेष गौरव करण्यात आला.
छायाचित्रण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, सामाजिक बांधिलकी आणि पत्रकारितेमधील योगदान याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी स्टीफन सपकाळे व सुशील सपकाळे उपस्थित होते. यापूर्वी दि. २६ जानेवारी २०२६ रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र शासन यांच्याकडून छोटू वारडे यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले होते. सुशांक डिजिटलचे संचालक म्हणून कार्यरत असलेले छोटू उर्फ भगवान वारडे यांच्या या सन्मानामुळे शहरासह जिल्हाभरातून त्यांचे कौतुक होत आहे.

No comments