adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

‘प्रत्येक मातेने शिवबांचे विचार बालकांच्या मनात पेरावेत’ - भारती साळवे यांचे प्रतिपादन

 ‘प्रत्येक मातेने शिवबांचे विचार बालकांच्या मनात पेरावेत’ - भारती साळवे यांचे प्रतिपादन  ​सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...

 ‘प्रत्येक मातेने शिवबांचे विचार बालकांच्या मनात पेरावेत’ - भारती साळवे यांचे प्रतिपादन 


​सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजा नव्हते, तर ते एक विचार आहेत. आजच्या पिढीला सुसंस्कारित आणि धाडसी बनवायचे असेल, तर प्रत्येक मातेने जिजाऊंच्या भूमिकेत शिरून आपल्या बालकांच्या मनात शिवरायांचे विचार पेरणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन साळवे क्लासेसच्या संचालिका भारती संघर्ष साळवे यांनी केले. स्थानिक 'साळवे क्लासेस' मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना संबोधित करताना भारती साळवे म्हणाल्या की, "महाराजांना घडवण्यात राजमाता जिजाऊंचा सिंहाचा वाटा होता. आजच्या पालकांनी केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता आपल्या पाल्यांना नैतिक मूल्ये, राष्ट्रप्रेम आणि महिलांचा सन्मान करण्याची शिकवण दिली पाहिजे. जेव्हा घराघरात शिवबांचे विचार रुजतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने सुराज्य येईल."  या निमित्ताने क्लासेसमधील विद्यार्थ्यांनी पोवाडे, शिववंदना आणि महाराजांच्या जीवनावर आधारित पार्थ जाधव , स्वरूप कदम, परिणीती साळवे या विद्यार्थ्यांनी  छोटेखानी भाषणे सादर केली. भगवे फेटे आणि 'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. कार्यक्रमाचे नियोजन क्लासेसच्या शिक्षक वृंदांनी केले होते. शेवटी उपस्थितांचे आभार संघर्ष साळवे यांनी केले.

No comments