जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा तालुका पोलिसांचा रूट मार्च ! संवेदनशील गावात कडक बंदोबस्त, पोलीस निरीक्षक निलेश तां...
जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा तालुका पोलिसांचा रूट मार्च ! संवेदनशील गावात कडक बंदोबस्त, पोलीस निरीक्षक निलेश तांबे!
संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सध्या सन 2026 सर्वत्रिक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्या अनुषंगाने निवडणूक काळात पोलिस आणि महसूल प्रशासनही कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्नशील दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने देखील पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये संवेदनशील गावामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा तालुका पोलीस ठाणे यांच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात जातीय दंगा काबू पथकांचा सराव करण्यात आला. सदर रूट मार्च हा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.वैशाली कुडकर उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी आपल्या पोलिस ठाणेकडील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना दिल्या होत्या. यावेळी सातारा शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के सातारा शहर वाहतूक सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव,पो.नि.मोरडे निवासी नायब तहसीलदार दत्तात्रय शिंदे वरिष्ठ लिपिक तुषार पोळ तहसीलदार दत्तात्रय शिंदे आरोग्य विभाग अग्निशामक दलाचे कर्मचारी, असे अधिकारी 47 पोलिस अंमलदार 1 आरसीपी पथक 7 शासकीय वाहने या रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील संवेदनशील, गावांमध्ये कडक बंदोबस्त राहणार असल्याचेही पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी सांगितले आहे.

No comments