ना.ना मुंदडा विद्यालयातील २००४ ते २००५ च्या १० वितील माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचा स्नेह संमेलन संपन्न.... मालेगाव वाशिम प्रतिनिधी...
ना.ना मुंदडा विद्यालयातील २००४ ते २००५ च्या १० वितील माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचा स्नेह संमेलन संपन्न....
मालेगाव वाशिम प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मालेगाव येथील ना.ना.मुंदडा विद्यालय मधील वर्ष 2004 ते 2005 च्या माजी दहावीतील बॅचचा स्नेहसंमेलन कार्यकम दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी ना.ना.मुंदडा विद्यालय मालेगाव येथे संपन्न झाला .यावेळी सेवानिवृत शिक्षक वृंद,माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी यांची बहुसंख्येने उपस्थित होते.
सविस्तर वृत्त असे की,दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी ना.ना. मुंदडा विद्यालय मालेगाव , तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथील सन 2004- 2005 च्या माजी दहावीतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचा स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न झाला. जवळपास 21 वर्षांपासून एकमेकांपासून दूर राहणाऱ्या आणि एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून भेट न झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ना.ना. मुंदडा विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक श्री. आघमकर सर, संस्थेचे अध्यक्ष अभिषेक मुंदडा सर ,मुख्याध्यापक श्री. उंटवाल सर, श्री कुबडे सर ,श्री. रोडे सर, श्री. जोशी सर ,श्री. देशमुख सर , सौ मुंदडा मॅडम, सौ देवळे मॅडम ,सौ.राजपूत मॅडम यांच्यासह त्यावेळचे सर्व शिक्षक वृंद आणि कर्मचारी वृंद यांची उपस्थिती होती.
ना.ना मुंदडा विद्यालय मालेगाव मधील बरेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे मोठमोठ्या पदावर सध्याच्या स्थितीला कार्यरत आहेत .परंतु दैनंदिन व्यस्त कामामुळे त्यांची भेट बऱ्याच वर्षापासून होत नव्हती . म्हणून आयुष्यामध्ये जगण्यास आनंद मिळावा आणि मरगळलेल्या जीवनाला नव संजीवनी द्यावी याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या ठरलेल्या नियोजनानुसार सकाळी विद्येची देवता सरस्वती यांच्या फोटोला मान्यवरांच्या हाताने हारांअर्पण आणि मानवंदना करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या वतीने करण्यात आले. यानंतर मान्यवरांचे मनोगत आणि माजी विद्यार्थ्यांचे मनोगत व्यक्त करण्यात आले. पाहुण्यांचे आणि विद्यार्थ्यांचे मनोगत व्यक्त झाल्यानंतर सर्व माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे आपापल्या त्याकाळी असलेल्या वर्गात जाऊन त्यावेळच्या शिक्षकांनी, शिक्षकांकडून आपल्या आवडत्या विषयाचे शिक्षण घेतले . यावेळी माझी शिक्षक आणि शिक्षकांनी सर्व माजी विद्यार्थ्यांनी, विद्यार्थिनींना मोलाचा संदेश दिला. हा संदेश एकूण सर्व विद्यार्थ्यांचे मन तृप्त झाले . सर्व विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनी यांनी सकाळच्या वेळेस नाश्ता आणि दुपारच्या वेळेस स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेतला. त्यानंतर संगीतमय वातावरणात नृत्य, लहानपणी खेळणारे खेळ ज्यामध्ये संगीत खुर्ची, रस्सीखेच , धप्पा कुटी ,गाण्याच्या भेंड्या इ .यांच्यासह बरेच खेळ खेळून त्यावेळी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनीं यांनी सोबत खेळण्याचा आनंद लुटला. सरते शेवटी डीजेच्या गाण्यावर मनोसक्त नृत्य करून सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी यांनी नाचण्याचा आनंद घेतला. शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन निखिल बांडे आणि दीपक आंधळे यांनी व्यक्त केले. बऱ्याच विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना डोळ्यातून आसवांचे बांध फुटले आणि आपल्या जिवलग मित्र आणि मैत्रिणी यांना गंभीर वातावरणात एकमेकांना गळ्यात मिठी मारून शेवटचा निरोप घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. नेहा काळे मॅडम यांनी केले .या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासा सर्व माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले. परत पुढच्या वर्षी आपण कार्यक्रम घेऊ या आशेने सर्वांनी आपला निरोप घेतला.

No comments