जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलीस प्रशासन सज्ज जिल्ह्यात कडक राहणार बंदोबस्त:- जिल्हा पोलीस अधीक्षक...
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलीस प्रशासन सज्ज जिल्ह्यात कडक राहणार बंदोबस्त:- जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी!
सातारा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
. सन 2026 च्या सर्वाधिक जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यात कडक बंदोबस्त ठेवला जाणार आहे अशी माहिती प्रसार माध्यमांतून जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी नुकतीच दिली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना देखील सूचना करण्यात आल्या आहेत. निवडणूक काळामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून त्या त्या पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये रूट मार्च काढण्यात सुरुवात झाली आहे. जिल्ह्यामध्ये निवडणूक दिवशी आणि निकाला दिवशी जादा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात सातारा पोलीस प्रशासन सज्ज असणार आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली आहे.

No comments