गोवंश कत्तल प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई..कत्तल करणारी टोळी १८ महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार..पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे आदेश ...
गोवंश कत्तल प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई..कत्तल करणारी टोळी १८ महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार..पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे आदेश
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:-राहाता तालुक्यातील ममदापूर येथे गोवंशीय जनावरांची अवैध कत्तल,गोमांस वाहतूक व गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत १८ महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी हद्दपारीचे आदेश जारी केले.टोळीप्रमुख फैजान जब्बार कुरेशी (शेख) याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार करून ममदापूर व लोणी परिसरात खुनाचा प्रयत्न, गोवंशीय जनावरांची अवैधरित्या वाहतूक, प्राण्यांवरील क्रूरता, गोमांस वाहतूक तसेच नागरिकांच्या जीवित व सुरक्षिततेला धोका निर्माण करणारे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. २०२१ ते २०२५ या कालावधीत टोळीने सातत्याने सराईतपणे गुन्हे केल्याची नोंद आहे.
पोलिसांनी यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही संबंधितांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यांच्या वाढत्या गुंडगिरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिक तक्रार देण्यास किंवा साक्ष देण्यास पुढे येत नव्हते.
या पार्श्वभूमीवर लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी टोळीविरुद्ध दोन वर्षांच्या हद्दपारीचा प्रस्ताव शिर्डी उपविभागीय कार्यालयाकडे सादर केला होता. या प्रस्तावाची चौकशी करून पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी शिफारशीसह अहवाल पोलीस अधीक्षकांकडे सादर केला. त्यानुसार अखेर १८ महिन्यांची हद्दपारी लागू करण्यात आली.
हद्दपार करण्यात आलेल्या आरोपींमध्ये
फैजान जब्बार कुरेशी (शेख),
मुन्तजीर मुनिर कुरेशी,
अब्दुल करीम अमिर कुरेशी,
मुनिर अमिर कुरेशी,
जब्बार हसन कुरेशी (शेख),
नाजीम आयुब कुरेशी,
वसीम आयुब कुरेशी,
रिजवान महेबुब कुरेशी
(सर्व रा. कुरेशी मोहल्ला, ममदापूर, ता. राहाता) यांचा समावेश आहे.
या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, पोलिसांच्या या कठोर भूमिकेमुळे गुन्हेगारीवर आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

No comments