वढोदा (ता. यावल) ग्रामपंचायतीत शिवजयंती उत्साहात साजरी भरत कोळी यावल (संपादक – हेमकांत गायकवाड) मनवेल (ता. यावल) येथून जवळ असलेल्या वढोदा ...
भरत कोळी यावल
(संपादक – हेमकांत गायकवाड)
मनवेल (ता. यावल) येथून जवळ असलेल्या वढोदा प्र. यावल येथील ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा परिषदेचे माजी गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सरपंच संदीप सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून शिवरायांच्या शौर्य, पराक्रम आणि स्वराज्य स्थापनेच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन केले. ग्रामविकासात एकजूट आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेशही त्यांनी दिला. या प्रसंगी उपसरपंच गोपाळ चौधरी, ग्रामपंचायत सदस्य गोविंदा सोनवणे, किरण कोळी, धनराज सोनवणे, पोलिस पाटील चेतन सोनवणे, समाधान कोळी, जितेंद्र कोळी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थितांनी शिवरायांना अभिवादन करत जयघोष केला आणि शिवजयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

No comments