adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार वाहिनी साहेब आता पुणे आणि बीडच्या पालकमंत्री पदावर नियुक्ती!

 उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार वाहिनी साहेब आता पुणे आणि बीडच्या पालकमंत्री पदावर नियुक्ती!  संभाजी पुरीगोसावी ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी.  (सं...

 उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार वाहिनी साहेब आता पुणे आणि बीडच्या पालकमंत्री पदावर नियुक्ती! 


संभाजी पुरीगोसावी ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

राज्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. त्यानंतर प्रशासकीय कामात खंड पडू नये यासाठी राज्य सरकारने मंत्रिमंडळात मोठे बदल केले आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदावर सुनेत्रा पवार यांची वर्णी लागली आहे. तर त्यांच्याकडेच आता पुणे आणि बीड या दोन्हीही जिल्ह्याचे पालकमंत्री पद संपविण्यात आले आहे. पुणे जिल्हा हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जात होता. या जिल्ह्याच्या विकास आणि प्रशासनावर त्यांची पकड होती. तोच वारसा पुढे नेण्यासाठी सुनेत्रा पवार यांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरही महायुतीत अनेक चर्चा सुरू होत्या मात्र अजित पवारांनी सुरू केलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सुनेत्रा पवार यांच्याच नावाचा आग्रह धरला होता. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मान्यता दिली आहे. जिल्हा प्रशासन विकास प्रकल्प व शासन आणि स्थानिक संस्थांमधील समन्वय साधणार आहे. पुणे आणि बीड हे दोन्ही जिल्हे राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहेत. पुण्यात पायाभूत सुविधांचे प्रकल्प मार्गी लावणे आणि बीड मधील राजकीय समीकरणे हाताळणे आणि कायदा सुव्यवस्था सांभाळणे हे सुनेत्रा पवार यांच्यासमोरील मोठे मुख्य आव्हान असणार आहे.

No comments