अकुलखेडा येथे संत शिरोमणी रविदास महाराजांची ६४९ वी जयंती उत्साहात साजरी अडावद | प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा तालुक्यातील ...
अकुलखेडा येथे संत शिरोमणी रविदास महाराजांची ६४९ वी जयंती उत्साहात साजरी
अडावद | प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील अकुलखेडा (ता. चोपडा) येथे संत शिरोमणी रविदास महाराजांची ६४९ वी जयंती मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी माजी सभापती गोपाळराव सोनवणे, प्रभाकर महाजन, तालुका अध्यक्ष सोपान मोरे, ग्रामपंचायत सदस्य वसंत मोरे, पोलीस पाटील सचिन विसावे, संतोष विसावे, उमेश विसावे, सरपंच योगेश पाटील, रवींद्र बाविस्कर, ज्ञानेश्वर मोरे, प्रल्हाद बाविस्कर, रोहिदास सोमवंशी, भरत पाटील, नाना वाघ, रवींद्र महाजन, अनंत महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने समाजबांधव व ग्रामस्थांनी कार्यक्रमाला हजेरी लावली.
याप्रसंगी तालुका अध्यक्ष सोपान मोरे यांनी संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जीवनकार्य व विचारांवर मार्गदर्शन करत समतेचा, बंधुत्वाचा आणि मानवतेचा संदेश दिला. कार्यक्रमात भजनी मंडळ डोंगर दे येथील प्रभाकर महाजन यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. या निमित्ताने माजी सभापती गोपाळराव सोनवणे यांच्या हस्ते प्रभाकर महाजन यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित समाजबांधवांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे मनापासून कौतुक केले. संपूर्ण कार्यक्रम शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी अकुलखेडा येथील सर्व समाजबांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments