adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अंकलेश्वर–बऱ्हाणपूर–चोपडा रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या इशाऱ्यानंतर जयेश हॉटेलजवळ काम सुरू

 अंकलेश्वर–बऱ्हाणपूर–चोपडा रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या इशाऱ्यानंतर जयेश हॉटेलजवळ काम सुरू   चोपडा प्रतिनिध...

 अंकलेश्वर–बऱ्हाणपूर–चोपडा रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात

आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या इशाऱ्यानंतर जयेश हॉटेलजवळ काम सुरू  


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा : अंकलेश्वर– बऱ्हाणपूर–चोपडा मार्गावरील रस्त्याची अत्यंत खराब अवस्था लक्षात घेऊन आमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI), जळगाव येथील प्रकल्प संचालकांना पत्र देऊन तात्काळ दुरुस्तीची मागणी केली होती. संबंधित विभागाला रास्तारोको आंदोलनाचा इशारा देण्यात आल्याने अखेर जयेश हॉटेलजवळील धोकादायक भागात दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

दि. २९ जानेवारी २०२६ रोजी पाठविलेल्या पत्रात आमदार सोनवणे यांनी अंकलेश्वर–बऱ्हाणपूर– चोपडा मार्गावरील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाल्याचे नमूद केले होते. विशेषतः चोपडा ते यावल दरम्यान पुलाजवळील भाग तसेच चोपडा–शिरपूर बायपास मार्गावरील हॉटेल जयेश समोरील रस्ता खड्ड्यांनी भरलेला असून अपघाताची शक्यता वाढल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट केले होते. यापूर्वी दुरुस्ती झालेल्या रस्त्यावरही पुन्हा खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली होती. 

संबंधित विभागाकडे पाठविलेल्या पत्रकानुसार आजपासून प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. काम सुरू असताना आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे तसेच कृउबा समिती चोपडा सभापती नरेंद्र पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उर्वरित धोकादायक भागांचीही तात्काळ दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

No comments