adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

देशभरातून शेकडो उद्योजकांना करोडोंनी फसवणूक करणार तो 'नटवरलाल राठी'अखेर अटकेत..!!!!

 देशभरातून शेकडो उद्योजकांना करोडोंनी फसवणूक करणार तो 'नटवरलाल राठी'अखेर अटकेत..!!!! अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकव...

 देशभरातून शेकडो उद्योजकांना करोडोंनी फसवणूक करणार तो 'नटवरलाल राठी'अखेर अटकेत..!!!!


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर: शहरात नोकरीचे आमिष तसेच ऑनलाईन उद्योग, व्यवसायाची जाहिरात देऊन गंडा घालणारी टोळी सक्रिय आहे. यामध्ये शेतकरी, व्यापारी तसेच सामान्य नागरिकांचा बळी गेला आहे. गेल्या काही वर्षा पासून मलकापूर तालुक्यातच नव्हे तर  महाराष्ट्रसह देशभरात या टोळीने बऱ्याच लोकांची फसवणूक केली आहे.

          मलकापूर परिसरात सातत्याने गेल्या काही वर्षांपासून आर्थिक फसवणुकीचे प्रकार घडत आहे. परिणामी शेतकरी, शेतमजूर, व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. परिणामी आत्महत्यांच्या ही घटना घडल्या आहेत. तरीसुद्धा आर्थिक फसवणुकीचे गुन्हे थांबता थांबेना. शिवाय प्रशासन सुद्धा अशा आर्थिक गुन्ह्यांवर कायमस्वरूपी उपाय किंवा अंकुश घालण्यात असफल ठरले आहे.

          आज पर्यंत मलकापुरात आर्थिक फसवणुकीचे नवनवीन फंडे वापरून जम्मू डॉन, पप्पू डॉन, विविध पतसंस्था, बँका यांनी आजवर अनेक नागरिकांना लुटले आहेत. अशातच आणखी 'राठी परिवारातील' काही सदस्य "नटवरलाल" च्या भूमिकेत आहेत. लीलाधर राठी, शैलेश लीलाधर राठी व कृष्णा प्रकाश राठी या एकाच कुटुंबातील सदस्यांनी "मां सचीया ट्रेडिंग कंपनी" च्या नावे फसवणुकीची आधुनिक पद्धत वापरून इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे मार्केटिंग करून महाराष्ट्रसह देशभरात वेगवेगळ्या उद्योजक, व्यवसायिकांची आर्थिक फसवणुक केली आहे.

           सदर नटवरलाल टोळी ही वेग वेगळ्या व्यवसायांचे विविध संकेतस्थळावर जाहिराती देऊन फेसबुक वर प्रोफाइल बनवून ग्राहकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात, जो रिक्वेस्ट स्वीकारेल त्याला उद्योग व्यवसायाची माहिती देतात त्या उत्पादनाच्या विक्रीतून मिळणाऱ्या जास्तीत जास्त नफ्या बद्दल सांगतात. देशातील प्रमुख शहरातील व्यावसायीकांना या टोळीने गंडा घातला आहे. फसवणुकीच्या घटनांमध्ये असुशिक्षित व्यक्ती पेक्षा सुशिक्षित व्यक्तींची संख्या मोठी आहे. अशा टोळ्यांना आश्रय देणारे व आरोपींचे बळ वाढवणाऱ्यांच्या नाग्या वेळेतच ठेचल्या गेल्या नाही, तर या टोळ्या फोपावतात व मोठे गुन्हे करण्यास त्यांची हिंमत वाढते. त्यामुळे अशा घातक वृत्तीपासून सावध राहिले पाहिजे. यासाठी प्रशासनाने सायबर क्राईम व ऑनलाइन फसवणुकी संदर्भात लोकांना जनजागृती करण्यात आली पाहिजे. काही महिन्यांआधी या कथित "नटवरलाल" राठीच्या विरोधात शिवसेने आक्रमक भूमिका घेत असंख्य फसगत झालेल्या उद्योजकांना एकत्र करत महाराष्ट्र सह संपूर्ण देशात विविध ठिकाणी गुन्हे दाखल केले होते. हा नटवरलाल आधुनिक युगातील ऑनलाइन साईट जसे की इंडिया मार्ट, जस्ट डायल यावरून नवीन उद्योजकांची माहिती घेतो व त्यांच्याशी संपर्क साधतो तसेच त्यांच्या व्यवसायाला भेट देतो या कामात त्याने काही डमी दलालांची स्वतंत्र यंत्रणा उभी केलेली आहे. ही संपूर्ण टीम उद्योजकांचा विश्वास संपादन करून त्यांना मालाची ऑर्डर देते व जेमतेम रक्कम ऍडव्हान्स म्हणून देते व उर्वरित रक्कम वायदा बाजाराप्रमाणे देण्याची कबुली देतात. 

           उद्योजक ठरल्याप्रमाणे मालाची डिलिव्हरी देतात. मात्र हा "नटवरलाल" डिलिव्हरी मिळाल्यानंतर उर्वरित रक्कम देण्यास आधी टाळाटाळ करतो नंतर काही दिवसांनी त्यांच्या संपर्क कक्षातून गायब होतो, बुलढाणा अर्बन बँकेचे करंट अकाउंट चेक देतो, असे बरेच नवनवीन फंडे करतो नंतर मिस्टर इंडिया प्रमाणे गायब होते व नवीन उद्योजक शोधतो.

बऱ्याच फसगत झालेल्या उद्योजकांनी एक "मलकापूर फ्रॉड" म्हणून व्हॉटस् अँप ग्रुप आहे तेथे याचे प्रचंड लाभार्थी आहे. सर्व व्यापाऱ्यांना आव्हान करण्यात येते की मलकापूरच्या या "नटवरलाल" राठी व त्याच्या मुलांशी व्यापाऱ्यांनी, उद्योजकांनी व्यवहार करतांना अती दक्षता घ्यावी या टोळीने राज्यातील व पर राज्यातील असंख्य व्यापारांना गंडविले आहे.

          आज तिसरे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी संगमनेर येथे विजया प्रदीप त्र्यंबके विरुद्ध सच्चीया ट्रेडिंग कंपनी प्रो. पा. शैलेश लिलाधर राठी या चेक बाऊन्स प्रकरणामध्ये अखेर त्या "नटवरलाल" शैलेश लिलाधर राठी ला मलकापूर पोलिसांनी अटक केली आहे व संगमनेर कोर्टात हजर करणार आहेत.

उद्योजक, व्यापारी, शेतकरी मायबाप, यांची होणारी आर्थिक लूट किंवा फसवणूक शिवसेना कधीही खपून घेणार नाही अशी भूमिकाच दिपक चांभारे पाटील, शिवसेना, - तालुका प्रमुख यांनी घेतली आहे.

No comments