adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्व.जयंतराव ससाणे साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त आधार कार्ड कॅम्प चे आयोजन नागरीकांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा - नगरसेविका सौ. प्रणिती चव्हाण

 स्व.जयंतराव ससाणे साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त आधार कार्ड कॅम्प चे आयोजन  नागरीकांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा - नगरसेविका  सौ....

 स्व.जयंतराव ससाणे साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त आधार कार्ड कॅम्प चे आयोजन 

नागरीकांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा - नगरसेविका  सौ. प्रणिती चव्हाण  


शौकत भाई शेख/ श्रीरामपूर: 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

श्रीरामपुर तालुक्याचे माजी आमदार स्व.जयंतराव ससाणे साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त,गोंधवणी रोड प्रभाग क्रमांक २ याठिकाणी श्रीरामपूर डाक घर कार्यालय यांच्या मार्फत शासकीय आधार कार्ड नोंदणी कॅम्प नगरसेविका सौ. प्रणिती दीपक चव्हाण यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. प्रभागातील नागरिकांच्या मागणीनुसार शिधापत्रिका धान्य वितरण प्रणाली मध्ये आधार कार्ड अपडेट नसल्याने बहुतांश रोजंदारी कामगार, नागरिक यांना स्वस्त धान्य केंद्र द्वारे महाराष्ट्र शासनाच्या अन्नधान्य वितरण व्यवस्थेचा लाभ मिळत नाही, त्यामुळे बहुतांश कुटुंब वंचित राहत असल्याने तसेच प्रभागातील पाच ते सहा अंगणवाडी मधील लहान मुले, स्तनदा माता यांना एकात्मिक बाल विकास योजने अंतर्गत पोषण आहार मिळणे अवघड झाले आहे यासोबतच गोंधवणी रोड पंचक्रोशीतील लाडकी बहीण योजनेसंदर्भात ई- केवायसी करीता मोठ्या प्रमाणात आधार कार्ड, पॅन कार्ड लिंक नसल्यामुळे हप्ता जमा झालेला नाही म्हणूनच महिला वर्ग या योजने पासून वंचित राहू नये तसेच भागातील ज्येष्ठ नागरिक यांच्या विविध शासकीय योजनांच्या थकीत अनुदान, डोल, पेन्शन आदी कार्यान्वित करण्यासाठी नागरिकांना अधिक सुलभ सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी श्रीरामपूर डाक विभाग यांच्या मोठ्या सहकार्याने सदरील शासकीय आधार कार्ड कॅम्प बुधवार दिनांक १८ फेब्रुवारी ते शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी पर्यंत श्री रामदेवजी बाबा समाज मंदिर गोंधवणी रोड याठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही प्रभाग क्रमांक २ च्या नगरसेविका सौ. प्रणिती दीपक चव्हाण यांनी केले आहे.

वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments