adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

उरुळी कांचनच्या राजकारणात नवा इतिहास! प्रथमच महिला पत्रकारांची इंट्री ग्रामपंचायत निवडणूक रिंगणात!

 उरुळी कांचनच्या राजकारणात नवा इतिहास! प्रथमच महिला पत्रकारांची इंट्री ग्रामपंचायत निवडणूक रिंगणात!   संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा) प्रतिन...

 उरुळी कांचनच्या राजकारणात नवा इतिहास! प्रथमच महिला पत्रकारांची इंट्री ग्रामपंचायत निवडणूक रिंगणात! 


 संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पुण्याच्या उरुळी कांचनच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासांत एक नवा अध्याय लिहिला जात आहे. आजवर अनेक चढउतार पाहिलेल्या या गावात प्रथमच एक महिला पत्रकार थेट ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. निर्भीड पत्रकारिता, प्रामाणिक मांडणी आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी सतत लढणाऱ्या सौ. सुवर्णा कैलास कांचन यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून. हा निर्णय उरुळी कांचनच्या राजकारणाला नवी दिशा देणारा ठरणारा आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय असलेल्या सौ.सुवर्णा कांचन यांनी सत्याची बाजू परखडपणे मांडत अनेकवेळा सत्ताधाऱ्यांची झोप उडवली आहे. अन्याय,भ्रष्टाचार, दुर्लक्षित प्रश्न यावर  सातत्याने आवाज उठवणाऱ्या या पत्रकारांने केवळ बातम्यांपुरते न थांबता प्रत्यक्ष नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सामाजिक क्षेत्रातही भक्कम कामगिरी केली आहे. रस्ते, पाणी,वीज,आरोग्य, महिला प्रश्न असोत किंवा शेतकऱ्यांचे ज्वलंत अशा मुद्द्यांवर—सुवर्णा कांचन नेहमीच पुढे दिसून आल्या. 

“प्रश्न मांडायचेच नाहीत तर पत्रकारितेचा उपयोग काय?” या भूमिकेतून काम करणाऱ्या सौ. सुवर्णा कांचन यांनी अनेक सामान्य नागरिकांना न्याय मिळवून दिला. त्यामुळेच आज त्या उरुळी कांचनमधील घराघरात ओळखीच्या बनल्या आहेत. निर्भीड, प्रामाणिक आणि कोणाच्याही दबावाला न झुकणारी महिला पत्रकार अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळेच ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांचा प्रवेश हा केवळ उमेदवारी नसून, प्रस्थापित राजकारणाला दिलेले मोठे आव्हान मानले जात आहे. महिला पत्रकार थेट सत्तेच्या केंद्रस्थानी जाणार ही बाब अनेकांना अस्वस्थ करणारी आहे.मात्र, गावातील तरुण, महिला आणि सामान्य नागरिकांमध्ये उत्साहांचे वातावरण पाहायला मिळत आहे. “गावाचा कारभार आता बातम्यांतून नाही तर थेट निर्णय प्रक्रियेतून बदलेल,” अशी चर्चा उरुळी कांचनमध्ये चांगलीच रंगली आहे. सुवर्णा कैलास कांचन यांचा हा निर्णय म्हणजे केवळ निवडणूक लढवण्यापुरता मर्यादित नसून, पारदर्शकता, जबाबदारी आणि जनहिंताचा कारभार आणण्याचा निर्धार आहे. उरुळी कांचनच्या राजकारणात हा प्रयोग यशस्वी ठरणार का, हे येणारा काळ ठरवेल. मात्र, एवढे नक्की की या निवडणुकीने गावच्या राजकीय समीकरणांना चांगलाच हादरा दिला आहे. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या महिला पत्रकार सौ. सुवर्णा कांचन यांच्या इंट्रीमुळे अनेकांना धक्काच बसला आहे.

No comments