adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

उनपदेव येथे आदिवासी बांधवांनी भोंगऱ्या बाजाराचे वाढवले श्रीफळ, गुलाल उधळीत केले भोंगऱ्या देवाचे पूजन : उनपदेव शररंगऋषी पाडा येथील आदिवासी बांधव भोंगऱ्यासाठी सज्ज

  उनपदेव येथे आदिवासी बांधवांनी भोंगऱ्या बाजाराचे वाढवले श्रीफळ, गुलाल उधळीत केले भोंगऱ्या देवाचे पूजन  उनपदेव शररंगऋषी पाडा येथील  आदिवासी ...

 उनपदेव येथे आदिवासी बांधवांनी भोंगऱ्या बाजाराचे वाढवले श्रीफळ, गुलाल उधळीत केले भोंगऱ्या देवाचे पूजन 

उनपदेव शररंगऋषी पाडा येथील आदिवासी बांधव भोंगऱ्यासाठी सज्ज  


चोपडा (संजीव शिरसाठ ) 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

     उनपदेव ता. चोपडा येथे आदिवासी बांधवांचा भोंगऱ्या बाजाराचे गुलाल उधळीत भोंगाऱ्यादेवाचे पूजन करून श्रीफळ वाढवीत आमंत्रण दिले. पुढील संपूर्ण आठवडा विविध गावांना भोंगाऱ्या बाजार भरणार आहे.

    २३ रोजी सकाळी १० वाजता उनपदेव येथे शरभंगऋषी पाडा येथे ज्या जागेवर भोंगऱ्या बाजार भरतो त्या ठिकाणी भोंगऱ्यादेवाची स्थापना करण्यात आली. पुजारा भाया पावरा यांचे हस्ते विधिवत पुजा करुन उपस्थितांवर गुलाल उधळून ' गुलाल्या' साजरा केला. 

    यावेळी पोलीस पाटील देवसिंग पावरा, पुजारा भाया पावरा, आदिवासी समाज सेवक संजीव शिरसाठ, विकासो माजी चेअरमन सचिन महाजन, वसंतराव देशमुख पतपेढीचे माजी चेअरमन मनोहर पाटील, पि आर माळी, जितेंद्रकुमार शिंपी, रफिक मण्यार, रायसिंग पावरा, रमेश बारेला, गजाराम पावरा, खुमसिंग पावरा, गाठ्या बारेला, दिलीप बारेला, आदर्श सोनवणे वनगावचे मधु भिल, शेवरे बु.चे पोलीस पाटील गणदास बारेला,  भायसी बारेला, मंगला बारेला, आमली बारेला, समरा बारेला, गुड्डी बारेला , अंबीबाई  बारेला, दुर्गाबाई बारेला, वाकडीबाई बारेला , सुकलाल बारेला, भागीराम बारेला सागर पावरा, रतन पावरा, प्रताप बारेला, रमेश बारेला, गेलसिंग बारेला . जगन महाराज यांचेसह अनेक आदिवासी बांधव उपस्थित होते .

No comments