मोठा वाघोदा ते निंभोरा रस्त्याचे काम निकृष्ट? सिमेंटची ग्रामसडक डांबरीकरणात दाबली! सिमेंटच्या सडक ला डांबरीकरणाची मुठमाती दिली! रावेर प्र...
मोठा वाघोदा ते निंभोरा रस्त्याचे काम निकृष्ट?
सिमेंटची ग्रामसडक डांबरीकरणात दाबली! सिमेंटच्या सडक ला डांबरीकरणाची मुठमाती दिली!
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा बुद्रुक ते निंभोरा ४किमी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले मात्र या चार किलोमीटर अंतरातील रस्ता काही वर्षांपूर्वी मोठा वाघोदा बुद्रुक गावातील एक किलोमीटर रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत सिमेंट काँक्रीटीकरण करून बनविण्यात आला होता तदनंतर काही दिवसांनंतर या रस्त्यावर मध्यभागी मोठमोठ्या भेगा एक दिड फुटांपर्यंत भेगा पडून मोठमोठे खड्डे पडले होते ज्यामुळे कोरडे व पावसाळ्यात खड्यांत रस्ता आहे की रस्त्यावर खड्डे हेच वाहनधारकांना उमगेनासे झाले होते वारंवार तक्रारी तसेच दैनिक वृत्तपत्रात बातम्या छापून आल्या तरी ही सार्वजनिक बांधकाम विभाग निंद्रीस्त होते?
मात्र पाच दिवसांपासून मोठा वाघोदा बुद्रुक ते निंभोरा रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू झाले आणि ते रस्त्यावर डांबरीकरणाचे काम करतही आले मात्र रस्त्यावर निकृष्ट दर्जाचे डांबर कछ बारीक खडी वापरून फक्त एकच इंचाचा थर देत रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले म्हणजेच जणू मलमपट्टी करण्यात आली तीही चक्क पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर डांबरीकरणाची एकच इंचाची चादर (कारपेट) टाकण्यात आली व सिमेंट काँक्रीटच्या सडकवर डांबरीकरण करुन मुठमाती देण्यात आली या रस्त्यावर ना सपाटीकरण ना जाड खडी टाकून रोडरोलरने दबाई काहीच न करता फक्त नि फक्त एकच इंचाचा निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून इंचभराचा थर टाकून काम उरकण्यात आले अजब तर या संपूर्ण ४ किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण झाले मात्र सावदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका ही अधिकारी कर्मचारी अथवा सुपरवायझर चे दर्शन ही काम पुर्ण होईपर्यंत घडले नसल्याने नागरिक अचंबित झाले संबंधित ठेकेदाराने महागड्या चारचाकी त बसून रस्त्यावरुन सफारी केल्याचे गावकर्यांतून बोलले जात आहे!
![]() |
| अगोदरची सिमेंट सडक |
विशेष मोठा वाघोदा बुद्रुक ते निंभोरा आणि मोठा वाघोदा बुद्रुक ते चिनावल या दोन्ही ही रस्त्यावर डांबरीकरण करण्यात येत आहे मात्र उपरोक्त पद्धतीत व तशाच प्रमाणेच करण्यात आले मोठा वाघोदा येथील चिनावल फाटा ते उर्दु शाळा पर्यंतच्या सिमेंट काँक्रीटीकरण च्या रस्त्यावर डांबरीकरण करुन पंतप्रधान ग्राम सडक योजना च सावदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व संबंधित ठेकेदाराने जमीनीत दाबण्याचे शुभकार्य या केलेल्या डांबरीकरणातून स्पष्ट दिसते?हा सर्व प्रकार उघड्या डोळ्यांनी जनतेनं पाहिला सावदा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शाखा अभियंता कनिष्ठ अभियंता सुपरवायझर यांना हा प्रकार दिसून आला नसावा का?का दिसल्यानंतर तेरी भी चूप मेरी चूप कुणाला काही सांगू नका?असला प्रकार तर घडला नसेल ना?,असा प्रश्न तर्कवितर्क जनसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे तरी या मोठा वाघोदा बुद्रुक ते निंभोरा व मोठा वाघोदा बुद्रुक ते चिनावल रस्त्यावरील फक्त एकदिड इंची डांबरीकरण प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग वरिष्ठ अधिकारी यांनी रस्त्याचे निरीक्षण करून करावे तसेच सदर रस्ता खोदून जाड खडी टाकून रोड रोलर ने दबाई करुन त्यावर माणसाप्रमाणे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून करण्यात येत आहे अन्यथा कायदेशीर आंदोलनाचा पवित्रा एक जिल्हा पदाधिकारी करणार असल्याचे समजते




No comments