श्रीरामपूर शहरवासीयांची गत झाली केवीलवाणी! प्यावे लागत आहे चक्क दुर्गंधीयुक्त घाण पाणी !! श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे शहरवासीयांना ...
श्रीरामपूर शहरवासीयांची गत झाली केवीलवाणी!
प्यावे लागत आहे चक्क दुर्गंधीयुक्त घाण पाणी !!
श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे शहरवासीयांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात ?
नगर पालिकेच्या गलथान कारभाराविरुद्ध समाजवादी पार्टी आमरण उपोषणाच्या पावित्र्यात - जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार 
श्रीरामपूर - नगराध्यक्ष करणदादा ससाणे यांना निवेदन देताना समाजवादी पार्टी चे जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार व अ. भा. लहुजी सेनेचे राष्ट्रीय सचीव हनिफभाई पठाण यांचे समवेत समस्त त्रस्त नागरीक
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
श्रीरामपूर नगर पालिका पाणी पुरवठा विभागातर्फे शहरात पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या नळाद्वारे येत असलेल्या दुर्गंधीयुक्त घाण पाण्यामुळे शहरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याविषयी समाजवादी पार्टी चे जिल्हाध्यक्ष जोएफ युनूस जमादार आणी समस्त त्रस्त नागरीकांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष श्रीरामपूर नगर पालिका यांना एका निवेदनाद्वारे स्वच्छ पाणी पुरवठा करणेबाबत मागणी केली आहे, तसेच तात्काळ यावर उचित पावले उचलली नाही गेल्यास दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ पासून नगर पालिका कार्यालयासमोर समस्त त्रस्त नागरीकांसह आमरण उपोषणास बसणार असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, श्रीरामपूर नगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे पिण्याचे पाण्याच्या नळांद्वारे शहरातील पंजाबी, कॉलनी, सिंधी कॉलनी,काझीबाबा रोड परिसर,नेहरुनगर परिसर,आदर्श हौसिंग सोसायटी,जमादार नगर,तसेच संपूर्ण श्रीरामपुर शहर आदी भागातील नागरीकांना गटारीचे घाण पाणी मिश्रीत दुषीत पाण्याचा पाणी पुरवठा होतो आहे.पाण्याचा रंगही पिळसर आहे शिवाय पाण्यात भयंकर दुर्गंधी (वास) येत आहे.हे पाणी पिल्यामुळे शहरात भयंकर रोगराईची साथ फैलावण्याची दाट शक्यता देखील नाकारता येत नाही, करीता श्रीरामपूर
विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.हेमंत (तात्या) ओगले, नगराध्यक्ष मा. करणदादा ससाणे आणी मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी जातिने लक्ष घालून त्वरित नागरीकांच्या या ज्वलंत समस्येंसंबधी तात्काळ कठोर पावले उचलावीत आणी शहरातील समस्त त्रस्त नागरीकांना उचित न्यात देत तात्काळ पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा कसा केला जाईल याकडे कटाक्षाने लक्ष घालावे अशी समाजवादी पार्टी आणी समस्त त्रस्त नागरीकांद्वारे मागणी करण्यात आली आहे.
तसेच शहरातील नागरीकांना गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याच्या नळाद्वारे गटारीचे दुर्गंधीयुक्त दुषीत घाण पाण्याचा पुरवठा केला जात असल्याच्या आजवर नगर पालिका प्रशासनाकडे अनेकवेळा अनेक तक्रारी करुनही संबंधित नगर पालिका प्रशासनाने आजवर कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नसल्याने शहरातील त्रस्त नागरीकांसह समाजवादी पार्टी श्रीरामपूर नगर पालिका कार्यालयासमोर उग्र आंदोलन छेडण्याच्या पावित्र्यात आहे.करीता वेळीच या ज्वलंत नागरी समस्यांचा योग्य बंदोबस्त व्हावा अशी अपेक्षा आहे,
यासोबतच संबंधित नगर पालिका पाणी पुरवठा विभागाचे काही कामचुकार अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष साईडवर न जाता नगर पालिकेत बसुन नेहमीच पाणी स्वच्छ असल्याचे प्रशासनास खोटे - नाटे रिपोर्ट सादर करुन नगर पालिका प्रशासनासह शासनाची देखील दिशाभूल करण्यात मोठे पटाईत असल्याने आपण स्वतः सदरील भागात नळांद्वारे येणाऱ्या दुर्गंधीयुक्त घाण पाण्याची स्वतः सहनिशा करावी आणी खोटे नाटे रिपोर्ट सादर करणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर देखील कायदेशीर कारवाई करावी अशीही आमची मागणी आहे.करीता आमच्या या रास्त मागणीचा सखोल विचार होऊन तात्काळ यावर उचित कार्यवाही करण्यात यावी अन्यथा समस्त त्रस्त नागरीकांसह समाजवादी पार्टी सोमवार सोमवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी पासून श्रीरामपूर नगर पालिका कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारेल व यापासून उद्भवलेल्या बऱ्या व वाईट परिणामाची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित नगर पालिका प्रशासनावर राहील कृपया याची नोंद घ्यावी ही विनंती.असेही शेवटी नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देतेवेळी समाजवादी पार्टीचे जोएफ जमादार, लहुजी सेनेचे हनीफ पठाण, विनोद जगताप, ओम त्रिभुवन, बाळासाहेब बागुल, अजय चिनोरीया, जैबुन्निसा जहागीरदार, चंद्रकला चव्हाण, पल्लवी जगताप, फरीदा शेख, शमीम पटेल, सुल्ताना शेख, शहनाज तांबोळी, मुश्तरी शेख प्रिया जनवेजा, सलमान शाह, रोहन परदेशी, तन्वीर शाह, परवेज शेख, दानिश शाह आदि उपस्थित होते.
या निवेदनावर समाजवादी पार्टी चे जिल्हाध्यक्ष जोएफ युनूस जमादार यांचेसह शहरातील समस्त त्रस्त नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत आणी या निवेदनाच्या प्रती आरोग्य मंत्री ना.प्रकाश आबिटकर, समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ.आबु असिम आझमी, श्रीरामपूर चे आमदार हेमंत ओगले, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बापुसाहेब नागरगोजे, श्रीरामपूर प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार राजेंद्र वाघ, पोलीस निरीक्षक (शहर) नितीन देशमुख आदिंना पाठवण्यात आल्या आहेत.

No comments