adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल, चोपडा येथे भव्य विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

 पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल, चोपडा येथे भव्य विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न चोपडा प्रतिनिधी (संपादक हेमकांत गायकवाड) “विज्ञान ही केवळ ज्ञाना...

 पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल, चोपडा येथे भव्य विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न


चोपडा प्रतिनिधी

(संपादक हेमकांत गायकवाड)

“विज्ञान ही केवळ ज्ञानाची शृंखला नसून विचार करण्याची एक पद्धत आहे,” या ख्यातनाम शास्त्रज्ञ कार्ल सेगन यांच्या विचाराला अनुसरून पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल, चोपडा येथे मंगळवार, दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य विज्ञान प्रदर्शनी उत्साहात पार पडली. या विज्ञान प्रदर्शनीत प्री-प्रायमरी ते इयत्ता ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, भाषा, कला आणि सर्जनशीलता या विविध क्षेत्रांतील प्रकल्प सादर करून विद्यार्थ्यांनी आपली कल्पकता व अभ्यासपूर्ण तयारी प्रभावीपणे मांडली. उपस्थित पालक व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. प्रदर्शनातील प्रमुख आकर्षण ठरले ते २० रोबोटिक्स प्रकल्प आणि १७ कोडिंग प्रकल्प. विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत नाविन्यपूर्ण संकल्पना सादर केल्या. संगणक विभागात एम.एस. वर्ड, पॉवरपॉईंट, एक्सेल आदी अनुप्रयोगांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. प्री-प्रायमरी विभागातील विद्यार्थ्यांच्या चित्रकला व हस्तकला स्टॉल्सनी विशेष लक्ष वेधून घेतले.

भाषा व गणित विषयांवरील शैक्षणिक प्रकल्प विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासपूर्वक सादर केले. कार्यक्रमाला कलात्मक स्पर्श देण्यासाठी  संगीत शिक्षक नितीन वाल्हे  यांनी प्रेरणादायी संगीत सादर करून वातावरण अधिक आनंदमय केले.

सकाळी ९.३० वाजता संस्थेचे अध्यक्ष  पंकज बोरोले  यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोलें, उपाध्यक्ष अविनाश राणे, प्राचार्य मिलिंद पाटील, समन्वयक शारदा मॅडम व उपमा जैस्वाल उपस्थित होते. कार्यक्रमास डॉ. दुर्गेश जैस्वाल,डॉ. राहुल पाटील, डॉ. पराग पाटील, डॉ. अतुल पाटील, डॉ. सचिन कोल्हे, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. अक्षय पाटील, डॉ. आनंद जाखटे, डॉ. जागृती सुराणा तसेच सचिन पाटील यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले. डॉ. रोशनी पाटील यांनी वसतिगृहात विशेष वैद्यकीय जनजागृती सत्र घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी कार्यक्रम प्रभारी स्वाती पाटील, ममता चौधरी,  शुभांगी पाटील  तसेच सर्व शिक्षकवृंद व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, पालकांचा मनापासूनचा प्रतिसाद, विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रभावी मांडणी आणि कला-संगीताचा सुंदर संगम यामुळे ही विज्ञान प्रदर्शनी भव्य, प्रेरणादायी आणि यशस्वी ठरली.

No comments