रमजान विशेष मुहम्मद पैगंबर (स.) यांची शिकवण पैगंबर मुहम्मद (स.) यांनी उपदेश केला, 'मोठ्या द्रोहांपैकी एक मोठा द्रोह आई वडिलांची अवज्ञा ...
रमजान विशेष
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी उपदेश केला, 'मोठ्या द्रोहांपैकी एक मोठा द्रोह आई वडिलांची अवज्ञा करणे आहे.'
एका व्यक्तीने पैगंबर मुहम्मद (स.)यांना विचारले, 'हे अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) संततीवर आईवडिलांचा अधिकार किती आहे?' तेव्हा ते म्हणाले, “जर तुम्ही आईवडिलांची
आज्ञा पाळली, त्यांची सेवा केली तर स्वर्गप्राप्तीचे मानकरी व्हाल व त्यांची अवज्ञा केली व त्यांना निराश ठेवाल तर
नरकाग्नीचे मानकरी ठराल.'
एकदा मुहम्मद (स.) यांनी सांगितले,'आपल्या आईवडिलांची सेवा व
आज्ञापान करा, तुमची संतती तुमचे आज्ञापालन व सेवा करणारी ठरेल.'पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, “जो अल्लाहवर व न्याय
निवाड्याच्या दिवसावर श्रद्धा बाळगत असेल त्याने शेजाऱ्याला त्रास देऊ नये.” तुमच्यावर शेजाऱ्याचे हक्क असे
आहेत- जर ते आजारी असतील तर त्यांची विचारपूस व देखरेख करा, मृत पावल्यांस जनाजाबरोबर जा. जर
तो कर्जाची मागणी करत असेल तर ऐपतीप्रमाणे कर्ज द्या. जर त्याच्याकडून चांगले लाभले तर त्याला शुभाशीर्वाद द्या, वाईट घडले तर त्याला माफ करा.
जर तो संकटात सापडला असेल तर त्याला धीर द्या व मदत करा.”
आपली इमारत त्याच्या इमारतीपेक्षा इतकी भव्य करू नका की त्याच्या घरात हवाच पोहोचू शकणार नाही. याचे
भान ठेवावे की तुमच्या स्वयंपाकाचा सुगंध त्याच्या घरापर्यंत पोहोचू नये.या शिवाय जो काही स्वयंपाक आपण
तयार करत आहात त्याच्यातून काही त्याच्याही घरी पाठवा.
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी एक
लहान वयाचा उंट एकाकडून उधार घेतला होता. पैगंबर मुहम्मद (स.)यांच्याकडे जकातचे उंट आले तेव्हा त्यांनी माननीय अबू रफिअ यांना सांगितले, “ज्या व्यक्तीकडून उंट घेतला आहे, त्या व्यक्तीला एक कमी वयाचा
उंट परत करा.” माननीय अबू रफिअ म्हणाले, “या उंटामध्ये एकच उंच आहे जो अत्यंत चांगला असून सात वर्षांचा
आहे.” पैगंबर मुहम्मद (स.) यांनी
सांगितले, "जर क्रय विक्रय करणारे सत्य बोलतील तर त्यांच्या व्यापारामध्ये वृद्धी दिली जाईल व खोटे बोलतील तर
वृद्धी घटविली जाईल. परंतु त्यामधील दोष जाहीर केले नसतील, जो माणूस
आवश्यक गरजेच्या वस्तूंचा साठा करण्याऐवजी वेळेवर बाजारामध्ये घेऊन येतो, तर तो अल्लाहच्या मदतीचा
हक्कदार ठरतो व आल्लाह त्याला रोजी देतो. जो भाववाढीच्या दृष्टीने साठवण
करून ठेवतो तो धिक्काराच्या लायकीचा आहे.".
अब्दुल सरदार पटेल
चोपडा, जि. जळगाव
मो. ८७६६७४७०९२

No comments