रमजान विशेष नमाजपठण आणि रोजे इस्लामी आचारसंहितेत श्रद्धेला स्थान आहेच आहे. यातही नमाजपठणाला विशेष महत्त्व आहे. अल्लाहचे स्मरण यातून होते...
रमजान विशेष
नमाजपठण आणि रोजे
इस्लामी आचारसंहितेत श्रद्धेला स्थान आहेच आहे.यातही नमाजपठणाला विशेष महत्त्व आहे. अल्लाहचे स्मरण यातून होते. समाज जोडला जातो. यात गरीब-श्रीमंत असा कोणताही भेद नसतो. नमाजाची एक पद्धत आहे. हजरत इब्राहिम (अ.)यांच्या मशिदीकडे म्हणजेच काबाकडे तोंड करून अल्लाहच्या सेवेत पाच वेळा उभे राहून,त्याच्यासमोर वाकून (रुकू) आपली नम्रता कबूल करण्याबरोबरच डोके टेकून (सजदा) असहाय्यता प्रकट केली जाते. नमाजला धर्माचा खांब म्हटले जाते.
प्रत्येक इस्लाम धर्मीयाला दिवसातून पाच वेळा नमाज पठण अनिवार्य करण्यात आले आहे. रोजा रमजानच्या महिन्यातील प्रथम क्रमांकाची उपासना म्हणजे 'उपवास (रोजा) राखणेहेच होय. बाकीच्या सर्व उपासना या मुख्य उपासनेला अनुषंगून राहतात. उपवासाच्या दरम्यानपाचवेळची नमाज, तरावीह (रमजानची अतिरिक्त नमाज), 'कुराण'
पठण, तहज्जुद (उत्तर रात्रीची नमाज),जकात(गोर-गरिबांना रकमेचे वाटप),जप, ईदच्या आदल्या दिवशी फित्रा (दान धर्म), एअतेकाफ (मशिदीत एकांतवास) रमजान महिन्यातील इत्यादी उपासनाअल्लाहला प्रिय अशा उपासना आहेत. परंतु एखाद्या सुजाण, प्रौढ आणि निरोगी व्यक्तीने उपवास न राखता बाकीच्या सर्व प्रार्थना पार पाडल्या, तर अशा कृत्याचा काहीच उपयोग नाही. होणार केलेल्या उपासनांचे पुण्य जरूर मिळेल, मात्र उपवास न राखण्याचा ईश्वरासमोर जाब विचारला जाईलआणि मृत्यूनंतर त्याच्या यातना भोगाव्यालागतील.
*अब्दुल सरदार पटेल*
चोपडा, जि. जळगाव
मो.8766747092

No comments