adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आशिष कांबळे यांनी वेळापूर पोलीस ठाण्यांचा पदभार स्वीकारला, तर भाऊसाहेब गोसावी यांची उचलबांगडी!

 आशिष कांबळे यांनी वेळापूर पोलीस ठाण्यांचा पदभार स्वीकारला, तर भाऊसाहेब गोसावी यांची उचलबांगडी!   संभाजी पुरीगोसावी (सोलापूर जिल्हा) प्रतिनि...

 आशिष कांबळे यांनी वेळापूर पोलीस ठाण्यांचा पदभार स्वीकारला, तर भाऊसाहेब गोसावी यांची उचलबांगडी! 


 संभाजी पुरीगोसावी (सोलापूर जिल्हा) प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

सोलापूर ग्रामीण पोलीस दलात काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरून अंतर्गत बदल्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये नातेपुते वेळापूर माढा मंद्रूप कामती या पोलीस ठाण्यात नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पोलीस खात्यामध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे आशिष कांबळे यांनी वेळापूर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे. तर वेळापूर पोलिस ठाणेचे तत्कालीन स.पो.नि. भाऊसाहेब गोसावी यांची ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. भाऊसाहेब गोसावी यांनी वेळापूर पोलीस ठाणेचा पदभार घेतल्यापासून आगामी निवडणुका सण उत्सव तसेच वेळापूर पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात त्यांना चांगलेच यश तसेच नेहमीच प्रयत्नशील दिसून आले, पोलीस ठाण्यात कालावधी पूर्णता: झाल्यामुळे त्यांची ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. तर यापूर्वी सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांनी यापूर्वी सातारा जिल्हा पोलीस दलातही वाई भुईंज पुसेगांव अशा पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

No comments