adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चौगाव येथील श्री क्षेत्र भोलेनाथ देवस्थान येथे महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन

 चौगाव येथील श्री क्षेत्र भोलेनाथ देवस्थान येथे महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन.  विश्राम तेले चौगाव  (संपादक -:- ह...

 चौगाव येथील श्री क्षेत्र भोलेनाथ देवस्थान येथे महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन. 


विश्राम तेले चौगाव 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा तालुक्यापासून जवळच असलेल्या चौगाव येथील श्री क्षेत्र भोलेनाथ देवस्थान येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा भक्तिमय सप्ताह दि. ९ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होऊन दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी संपन्न होणार आहे.

या अखंड हरिनाम सप्ताहात दररोज सकाळी काकड आरती, सायंकाळी हरीपाठ तसेच रात्री ८.३० ते १०.३० वाजेपर्यंत कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. या सप्ताहात नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन होणार असून दि. ९/२/२०२६ रोजी ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे (मुक्ताईनगर), दि. १०/२/२०२६ रोजी ह.भ.प. योगी दत्तानाथ महाराज (शिंदखेडा), दि. ११/२/२०२६ रोजी ह.भ.प. भानुदास महाराज (अमळनेरकर), दि. १२/२/२०२६ रोजी ह.भ.प. रविंद्र महाराज वरसाडेकर, दि. १३/२/२०२६ रोजी ह.भ.प. कोमल महाराज खेडीभोकरीकर, दि. १४/२/२०२६ रोजी ह.भ.प. भावेश महाराज विटनेरकर तसेच दि. १५/२/२०२६ रोजी ह.भ.प. योगेश महाराज वाघाडीकर यांचे कीर्तन संपन्न होणार आहे.

दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी ह.भ.प. गजानन महाराज चौगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचा समारोप होणार आहे. याचबरोबर दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी नगरप्रदक्षिणा व दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचा व कीर्तन श्रवणाचा लाभ भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन श्री भोलेनाथ सत्संग मंडळ चौगाव, श्री श्रीराम भजनी मंडळ चौगाव तसेच ग्रामस्थ मंडळ चौगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments