अमळनेर लिनस क्लबतर्फे कमला नेहरू मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहात साहित्य वाटप मुलींनी गरिबीवर मात करत शिक्षणात मजल मारावी : डॉ. प्रा.सौ....
अमळनेर लिनस क्लबतर्फे कमला नेहरू मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहात साहित्य वाटप
मुलींनी गरिबीवर मात करत शिक्षणात मजल मारावी : डॉ. प्रा.सौ.नयना नवसारीकर
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा:-गोरगरीब, आदिवासी, गरजवंत विद्यार्थिनींना शिक्षण घेता यावे यासाठी शासनाने वस्तीगृहांच्या माध्यमातून फार मोठी सेवा उपलब्ध करून दिली आहे या संधीच सोनं करून विद्यार्थिनींनी स्व: पायावर उभे राहून उच्च शिक्षणापर्यंत मजल मारून समाजात महिलांची प्रतिमा उच्च करावी तसेच शैक्षणिक मार्गात काही अडचण आल्यास मदतीसाठी आम्हास हाक द्या असे आवाहन लिनस क्लबच्या कॅबिनेट ऑफिसर डॉ .प्रा.सौ. नयना नवसारीकर यांनी आज येथे केले.
त्या अमळनेर लीनेस क्लब तर्फे चोपडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहु उद्देशीय संस्था संचलित कमला नेहरू मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहात आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थिनी संजना डावर, सपना पावरा, रंगीचा बडोले, पूजा बारेला, रोशनी पावरा, सोनू बिलाला यांनी सुरेख गीत गाऊन आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले.
यावेळी क्लब तर्फे विद्यार्थिनींना उपयोगीअंघोळीचे साबण, कपडे धुण्याची साबण, बासमती तांदूळ तेल,दाळी गुलाब जामुन व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. प्रसंगी क्लबचे अध्यक्षा कविता पारख, माजी जिल्हाध्यक्ष कांचन शहा, जास्मिन भरुचा(केअर फॉर गर्ल्स वुमेन पॉवर्स), परमेंद्र कारला(कॅबिनेट ऑफिसर), संस्था अध्यक्ष महेश पी.शिरसाठ, पत्रकार छोटू वारडे, अधीक्षिका कावेरी कोळी, कर्मचारी वर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments