सरदार वल्लभ भाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आणि सेमी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी भरत ...
सरदार वल्लभ भाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आणि सेमी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दि . 19 फेब्रुवारी 2026 रोजी सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम व सेमी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शाळेचे अध्यक्ष डॉ .प्रदीप माहेश्वरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शीला तायडे मॅडम यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे दैवत व आन-बान शान छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली प्रथम महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शीला तायडे मॅडम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. सौ शीला तायडे मॅडम व सर्व शिक्षकांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा दिला. कार्यक्रमा प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments