adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

केडगाव येथील अनोळखी ३५ वर्षीय पुरुषाचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू..कोतवाली पोलिसांचे ओळख पटविण्याचे आवाहन

 केडगाव येथील अनोळखी ३५ वर्षीय पुरुषाचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू..कोतवाली पोलिसांचे ओळख पटविण्याचे आवाहन  सचिन मोकळं अहिल्...

 केडगाव येथील अनोळखी ३५ वर्षीय पुरुषाचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू..कोतवाली पोलिसांचे ओळख पटविण्याचे आवाहन 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.१४ फेब्रुवारी २०२६):-कोतवाली पोलीस स्टेशन येथे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १९४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

केडगाव (ता.जि.अहिल्यानगर) येथील अंदाजे ३५ वर्षीय अनोळखी पुरुषास दि. १४/०२/२०२६ रोजी सकाळी १०.४४ वाजता सिव्हिल हॉस्पिटल,अहिल्यानगर येथे दाखल करण्यात आले होते.मात्र उपचार सुरू असताना दुपारी १२.५६ वाजता संबंधित इसमाचा मृत्यू झाला.

सदर बाबीची माहिती सिव्हिल हॉस्पिटलचे मेडिकल ऑफिसर डॉ.लोखंडे यांनी पोलिसांना दिल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली.पुढील तपास हवालदार भरत गाडीलकर मो.९१४५४७८०३९ (नेमणूक – कोतवाली पोलीस ठाणे, अहिल्यानगर) हे करत आहेत. दरम्यान,मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.

No comments