adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दहशतीचा अंत! बंदुकीसह फिरणारा आरोपी कोतवाली पोलिसांच्या जाळ्यात

 दहशतीचा अंत! बंदुकीसह फिरणारा आरोपी कोतवाली पोलिसांच्या जाळ्यात  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर:-शनिवार दि. ...

 दहशतीचा अंत! बंदुकीसह फिरणारा आरोपी कोतवाली पोलिसांच्या जाळ्यात 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:-शनिवार दि. ०७/०२/२०२६ रोजी कोतवाली पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोउनि.प्रवीण पाटील हे त्यांचे सहकारी अमलदारांसोबत कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना त्यांना कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी कळविले की, आठवण खंडोबा परिसरात एक इसम हा अनधिकृत अग्निशस्त्र बाळगत असून तो लोकांना दहशत करत आहे.

अशी फोनद्वारे आदेशित केल्याने लागलीच पोउनि.प्रवीण पाटील यांनी त्यांचे सहकारी अमलदार यांना सदर माहिती कळवून लगेच काटवण खंडोबा परिसरात महात्मा फुले बसस्थानक कडून सुलभ कन्ट्रक्शन शिवसागर आपारमेंट कडे जाणारे रोडकडे फिरत असताना तेथे आढळून आलेला संशयित इसम हा अग्निशस्त्र बाळगत असून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याचे निदर्शनास आले.त्यानंतर त्याचेकडे एक अग्निशस्त्र व दोन जिवंत काडतुसे मिळून आलेली असून त्याचे नाव विनोद चंदर शिंदे (रा. बुरुडगाव पाण्याचे टाकीजवळ ता.जि.अहिल्यानगर) असे असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन येथे पोलीस अंमलदार शिरीष तरटे यांच्या फिर्यादीवरून गु. र. नं.९२/२०२६ भादवि कलम २५(१)(ब) १ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर भाग दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व तत्कालीन तोफखाना पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस अंमलदार संतोष बनकर, विशाल दळवी,विनोद बोरगे, शाबीर शेख,राहुल शिंदे,रोहिणी दरंदले,अभय कदम,दीपक रोहकले,शिरीष तरटे,दत्तात्रय कोतकर,अमोल गाडे,सुरज कदम,सत्यम शिंदे,अतुल काजळे,रमेश शिंदे,सोमनाथ राऊत,महेश पवार,अतुल लाटे, तसेच दक्षिण मोबाईल सेलचे अंमलदार राहुल गुंडू यांनी केली आहे.

No comments