स.पो.नि. सचिन कांडगे यांच्याकडून चांगल्या कामाची पोचपावती :- जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी! संभाजी गिरीगोसावी प्रतिनिधी. (संपादक -:- ह...
स.पो.नि. सचिन कांडगे यांच्याकडून चांगल्या कामाची पोचपावती :- जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी!
संभाजी गिरीगोसावी प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सातारा जिल्हा पोलीस दलातील रहिमतपूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी रहिमतपूर पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून गेल्या दोन वर्षाच्या आपल्या कार्यकाळात नेहमीच प्रयत्नशील दिसून आले रहिमतपूरकरांचे ते आधारस्तंभ बनले होते. खाकी वर्दींतील आपलेपणा जपणारा सर्व जनतेशी समन्वय आणि मनमिळावू स्वभावाचे अधिकारी म्हणून सचिन कांडगे यांना ओळखले जाते. रहिमतपूर पोलीस ठाण्यातील आजपर्यंतच्या त्यांच्या विविध तपासाच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडून चांगल्या कामाची पोचपावती मिळाली आहे. रहिमतपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्यांनी कायदा व सुव्यवस्था आणि गुन्हेगारींवर नियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. स्थानिक स्तरांवर गुन्हे शोधणे तपास करणे आणि नागरिकांच्या देखील समस्या सोडविण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील दिसून आले, आजही त्यांच्या पुणे ग्रामीण येथील झालेल्या बदलीमुळे रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या परिसरांतील जनतेंमध्ये सध्या भावनिक वातावरण निर्माण झाले आहे. बदली रद्द करण्याची मागणीही जनतेने होत आहे. खाकी वर्दी म्हटलं की आपणाला धडकी बसते, पण या खाकी वर्दींतच एक आपलेपणा तेवढाच दिसून येतो. आपल्या कामाची पोचपावती जनतेला दिसत असेल तर आपल्यासाठी जनता भावनिक नक्कीच होत असते. हेच ते सातारा जिल्हा पोलीस दलातील अधिकारी म्हणजेच सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय सचिन कांडगे रहिमतपूरकरांचे देवमाणूस नाही तर आधारस्तंभ देखील बनले होते. आजही तमाम जनतेंतून साहेब आपली बदली थांबवा, तुम्ही आम्हांला इथे पाहिजे अशा प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहेत. आज सातारा पोलीस मुख्यालयात पोलीस अधीक्षकांनी त्यांचे स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी म्हणाले आपल्याकडून आम्हांला चांगल्या कामाची पोचपावती मिळाली. यावेळी त्यांना शुभेच्छा आणि स्वागत करताना पोलीस अधीक्षक देखील भावुक झाले होते.

No comments