adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

खामगाव येथे देवाधिदेव महादेव व माता पार्वतीचा शुभविवाह सोहळा उत्साहात

 खामगाव येथे देवाधिदेव महादेव व माता पार्वतीचा शुभविवाह सोहळा उत्साहात  पल्लवी पाटील खामगाव   (संपादक -:- हेमकांत गायकवाड) खामगाव: रेखाप्लॉट...

 खामगाव येथे देवाधिदेव महादेव व माता पार्वतीचा शुभविवाह सोहळा उत्साहात 


पल्लवी पाटील खामगाव  

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

खामगाव: रेखाप्लॉट, खामगाव येथे देवाधिदेव महादेव व जगतजननी माता पार्वती यांच्या शुभविवाह सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री विघ्नहर्ता महाशिवरात्री उत्सव समिती, रेखाप्लॉट खामगाव यांच्या वतीने हा सोहळा भक्तिभावात साजरा होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात रविवार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४ वाजता महापूजेसह होणार असून त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता वधू आगमन, तसेच शिवशक्ती मिलन (लग्न) हा मुख्य सोहळा सायंकाळी ७.१० वाजता गोरज मुहूर्तावर संपन्न होणार आहे. सायंकाळी ७.३० वाजता भस्म आरती व महाआरती आयोजित करण्यात आली आहे. शनिवार, दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी देवकुंडी, मेहंदी व हळद कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता पार पडणार असून विवाह स्थळ रेखाप्लॉट, खामगाव येथेच ठेवण्यात आले आहे. तसेच सोमवार, दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता श्यामबाबा कीर्तन आणि रात्री ७ ते १० या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या पवित्र विवाह सोहळ्यास परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री विघ्नहर्ता महाशिवरात्री उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments