जि. प. प्राथमिक शाळा खाऱ्यापाडावची श्री क्षेत्र भिलटदेव येथे शैक्षणिक सहल उत्साहात चंद्रकांत पाटील विचखेडा (संपादक -:-हेमकांत गायकवाड) जि...
जि. प. प्राथमिक शाळा खाऱ्यापाडावची श्री क्षेत्र भिलटदेव येथे शैक्षणिक सहल उत्साहात
चंद्रकांत पाटील विचखेडा
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खाऱ्यापाडाव या आदर्श शाळेची परिसर भेट व शैक्षणिक सहल पवित्र स्थळ श्री क्षेत्र भिलटदेव येथे उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांना निसर्गसौंदर्याचा अनुभव देत शैक्षणिक ज्ञानाची जोड देणारी ही सहल संस्मरणीय ठरली. या शैक्षणिक उपक्रमासाठी नागलवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय देवेंद्र दादा यांची प्रेरणा व अनमोल सहकार्य लाभले. सहलीचा संपूर्ण खर्च शाळेचे आदर्श मुख्याध्यापक आदरणीय कचवे सर यांनी स्वतः केला. विद्यार्थीहिताला प्राधान्य देत त्यांनी हा उपक्रम यशस्वीरीत्या राबवला. सहलीदरम्यान शिक्षक श्री. मा. कैलास बारेला सर व श्री. मा. रविंद्र पाटील सर यांनी विद्यार्थ्यांच्या उत्साहासोबतच शिस्त अबाधित ठेवत आवश्यक मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या आनंदात भर घालत त्यांनी संपूर्ण सहलीत जबाबदारीने सहकार्य केले.
शाळा ही समाजनिर्मित संस्था असल्याने समाजाचा सहभागही महत्त्वाचा असतो. याच अनुषंगाने ग्रुप ग्रामपंचायत वैजापूरचे आदरणीय सरपंच दत्ता सिंग पावरा, उपसरपंच मा. चंद्रकांत बारेला तसेच त्यांचे पाहुणे श्री. बारेला दादा यांनी विद्यार्थ्यांच्या प्रवासाची सोय व खाऊची व्यवस्था करून त्यांच्या आनंदात भर घातली. तसेच जि. प. शाळा वैजापूरचे मुख्याध्यापक राजेंद्र चौधरी सर यांनीही विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवून सहलीस अनमोल सहकार्य केले. श्री क्षेत्र भिलटदेव या निसर्गरम्य परिसरात विद्यार्थ्यांनी नदी, विविध नैसर्गिक वनस्पती तसेच भिलटदेव या पवित्र स्थळाच्या इतिहासाची माहिती जाणून घेतली. दैनंदिन शैक्षणिक प्रक्रियेपासून वेगळा, आनंददायी आणि ज्ञानवर्धक अनुभव विद्यार्थ्यांना या सहलीतून मिळाला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित करणारी ही शैक्षणिक सहल यशस्वी ठरली असून, जि. प. प्राथमिक शाळा खाऱ्यापाडाव व मुख्याध्यापक कचवे सर यांच्या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

No comments