adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

म्हसावदमध्ये द्वारकाबाई थेपडे इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे शिवजयंतीचा उत्साह; _चिमुकल्यांच्या लेझीम पथकाने वेधले लक्ष!_

 म्हसावदमध्ये द्वारकाबाई थेपडे इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे शिवजयंतीचा उत्साह;  _चिमुकल्यांच्या लेझीम पथकाने वेधले लक्ष!_  जळगाव जिल्हा प्रतिनि...

 म्हसावदमध्ये द्वारकाबाई थेपडे इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे शिवजयंतीचा उत्साह;  _चिमुकल्यांच्या लेझीम पथकाने वेधले लक्ष!_ 


जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

​म्हसावद:- येथील कै. द्वारकाबाई थेपडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित भव्य शोभायात्रेने संपूर्ण म्हसावद गाव 'शिवमय' झाले होते. 


​कार्यक्रमाची सुरुवात शिवरायांच्या प्रतिमेच्या आरतीने करण्यात आली. त्यानंतर गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली, ज्यामध्ये शिवकालीन परंपरेचे दर्शन घडले. विशेषतः इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली शिवगर्जना, लेझीम आणि बहारदार नृत्यांनी ग्रामस्थांचे डोळे दीपवून टाकले. या चिमुकल्यांच्या उत्साहाने संपूर्ण गावाचे लक्ष वेधून घेतले होते. गावातील मुख्य चौकांमध्ये ग्रामस्थ आणि शिक्षकांच्या हस्ते आरती करण्यात आली, ज्यात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

​या सोहळ्यासाठी शाळेच्या प्राचार्या सौ. संगिता पाटील मॅडम आणि पगारे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच स्वा. सै. पं. ध. थेपडे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जी. डी. बच्छाव सर, उपमुख्याध्यापक सर, पर्यवेक्षक के. पी. पाटील सर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवरायांबद्दलचा आदर आणि स्वाभिमानाची भावना अधिक दृढ झाली.

No comments