adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आझाद मैदानावर कोळी जमातीचा एल्गार मागण्या मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा:- दत्ताभाऊ सुरवसे

 आझाद मैदानावर कोळी जमातीचा एल्गार मागण्या मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा:-  दत्ताभाऊ सुरवसे  अमोल बावस्कार मुंबई  (संपादक -:- हेमकांत गायक...

 आझाद मैदानावर कोळी जमातीचा एल्गार मागण्या मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा:-  दत्ताभाऊ सुरवसे 


अमोल बावस्कार मुंबई 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मुंबई: 'कोळी' हे जातीचे खरे नाव नाही त्यामध्ये अनेक उपविभाग असून कोळी नावाखाली आदिवासी जमातीचे अस्तित्व पुसण्याचे डाव थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा आंदोलनकर्ते दत्ताभाऊ सुरवसे यांनी आइसद मैदानात दिला. सुरवसे यांनी आपले म्हणणे सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे.कोळी हा शब्द केवळ एका जातीपुरता मर्यादित नसून तो अनेक आदिवासी जमातींचा समूह आहे. त्यामध्ये कोळी महाचेच किंवा डोंगर कोळी, डोर कोळी किंवा टोकरे कोळी व कोळी मल्हार या जमाती ऐतिहासिक दृष्टया आदिवासी कोळी समूहाचे अविभाज्य घटक आहेत. या जमाती १९५० पूर्वीपासून राष्ट्रपतीच्या यादीमध्ये स्पष्टपणे आदिवासी म्हणून अस्तित्वात आहेत, याचे असंख्य मानव वंश शास्त्रीय व ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत.


या सत्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आदिवासी जमातीवर आदिवासी विकास विभाग शासन निर्णय २४ एप्रिल १९८५ मध्ये १९५० पूर्वीच्या मानववंशशास्त्रीय पुराव्यांचा पुरेसा विचार न करता, या स्वतंत्र जमाती आहेत. या जमातीचा कोळी जमातीशी काहीही संबंध नाही, असे अन्यायकारक लेखन शासनाकडून झाल्याने जमातीवर अन्याय होत आहे. हा अन्याय घटनात्मक अधिकारावर घाला असून, आता तो सहन केला जाणार नाही. यामुळे हजारो आदिवासी कुटुंबे जात पडताळणी, शिक्षण, नोकरी, आरक्षण, विकास योजनांपासून वंचित राहत आहेत.अनुसूचित जमात आदेश जारी होण्यापूर्वी म्हणजे १९५० पूर्वी, या सर्व जमाती गटाच्या शालेय व महसुली नौदी फक्त' कोळी म्हणूनच नोंद झाल्या आहेत. राज्य शासनाने या न्याय्य मागण्यांकडे तत्काळ लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा,अन्यथा हे आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती आंदोलनकर्ते दत्ताभाऊ सुरवसे यांनी केली आहे. 

No comments